आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Picture of Goddess Lakshmi Keep Here In Home Maybe Gain Wealth

घरामध्ये या ठिकाणी लावा लक्ष्मीचा फोटो, होऊ शकतो धनलाभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरामध्ये सुंदर फोटो लावल्याने घराचे सौंदर्य आणखी वाढते. परंतु फार कमी लोकांना हे माहिती असावे की, घरात लावण्यात येणार्‍या फोटोंचा प्रभाव तेथे राहणार्‍या सदस्यांच्या आयुष्यावरही पडतो. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये श्रुंगार, हास्य आणि शांतात निर्माण करणारे फोटो लावावेत. येथे जाणून घ्या, घरात कोणत्या प्रकारचे फोटो लावल्याने कोणता लाभ होतो.

1- लक्ष्मी आणि कुबेरदेवाचा फोटो उत्तर दिशेला लावावा. हा उपाय केल्याने धनलाभ होण्याची शक्यता आणखी वाढते.
2- फळं-फुलं, हसणार्‍या मुलांचे फोटो जीवनशक्तीचे प्रतिक आहेत. असे फोटो पूर्व आणि उत्तर दिशेला लावणे शुभ राहते. यामुळे जीवनात आनंद राहतो.
3- जर तुम्हाला पर्वत किंवा नैसर्गिक दृश्यांचे फोटो लावण्याची इच्छा असेल तर दक्षिण किंवा उत्तर दिशेला हे फोटो लावावेत.

इतर वास्तू टिप्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....