आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Powerful Devi Mantra Kawach For Solve Problems Quickl

PICS : कुटुंबावर आलेले संकट दूर करण्यासाठी अवश्य करा हा सोपा उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनुष्याचे मन अशांत आणि तणावग्रस्त असेल तर त्याचे कामात आणि कुटुंबामध्ये मन रमत नाही. अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मनुष्याचे वाईट पाऊल पडू शकते. त्यामुळे मनुष्याने स्वतःचे काय चुकले याचा शांत मनाने विचार करावा.

धार्मिक दृष्टीनुसार तन, मन, धन किंवा ग्रहदोषामुळे निर्माण होणारी भीती, कुटुंबावर आलेले संकट दूर करण्यासाठी देवीची उपासना करणे हा एक उत्तम मार्ग आहे. त्यासाठी शुक्रवारी किंवा देवी उपासनेच्या शुभ मुहूर्तावर दुर्गासप्तशतीच्या मंत्राचा जप करावा.

पुढे दिलेल्या दुर्गासप्तशती मंत्राचा ध्यानपूर्वक जप केल्याने मनातील भीती संपून जाते. कुटुंबातील अशांततेचे वातावरण बदलू लागते. काम करण्यात मन लागते. सर्व अडचणी दूर होण्यास मदत होते.