आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दररोज या 10 नावांचे स्मरण केल्यास पूजा न करताही दूर होतात सर्व शनिदोष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्म ग्रंथानुसार शनिदेव नशिबाचा धनी बनवणारे देवता आहेत. कारण ते केवळ दंडाधिकारी नसून कर्मयोगी आहेत. यामुळे पुरुषार्थी व्यक्तीवर ते नेहमी प्रसन्न राहतात असे मानले जाते. शनि कृपा प्राप्तीसाठी शनिवारी पूजा, दान, धार्मिक उपायांव्यतिरिक्त शास्त्रामध्ये काही असे उपाय सांगण्यात आले आहेत. जे विशेषतः कामात व्यस्त असणार्या लोकांना कमी वेळेत करता येतील असे आहेत.

ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीत बलवान शनि भाग्यविधाता मानले गेले आहेत. शनिदेवाला प्रसन्न करून दुर्भाग्याचा नाश करणाऱ्या सोप्या उपायांमधीलच एक उपाय म्हणजे शनिदेवाच्या नाम मंत्राचा उच्चार करणे. शनीच्या या नावांचे स्मरण केल्यास शनिदोष दूर होतात. आरोग्य, धन-धान्य, विद्या, बळ आणि पराक्रम, सौभाग्य या सर्व इच्छा पूर्ण होतात.

या 10 नाम मंत्राचा जप शनि मंदिरात करावा. दररोज या नावांचा जप केल्या शनिदेव प्रसन्न होतात.

- कोणस्थ
- पिंगल
- बभ्रू
- कृष्ण
- रौद्रांतक
- यम
- सौरी
- शनैश्चर
- मन्द
- पिप्पलाश्रय
पुढे वाचा, शनीची साडेसाती आणि शनिदोषाचे प्रभाव कमी करणारे आणखी काही खास उपाय....
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)