आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुधवारी करा हा छोटासा उपाय, श्रीगणेश पूर्ण करतील प्रत्येक इच्छा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्म प्रथांमध्ये बुधवार सर्व सुखांचे मूळ बुद्धीचे दाता भगवान श्रीगणेशाच्या उपासनेचा दिवस आहे. श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी विविध विधान, उपाय, मंत्र शास्त्रात सांगण्यात आले असून हे सोपे आणि शुभ फलदायी आहेत. बुधवारी श्रीगणेशाला मोदकाचा किंवा लाडूचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. गणपतीला मोदक अत्यंत प्रिय आहेत.

हिंदू धर्मशास्त्रानुसार कलियुगात गणपतीची धूम्रकेतु स्वरुपात पूजा केली जाते. ज्याचे दोन हात आहेत. परंतु मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी चतुर्भुज गणपतीची पूजा करणे लाभदायक ठरते. ज्यामध्ये एका हातात अंकुश तर दुस-या हातात पाश तिस-या हातात मोदक आणि चौथ्या हातात आशीर्वाद आहे.

मोदकाचा अर्थ - जो मोद( आनंद) देतो, ज्यामुळे आनंद प्राप्त होतो. याचा अर्थ असा आहे की शरीराचा आहार असो किंवा मनातील विचार हे दोन्ही शुद्ध असले पाहिजेत. तेव्हाच तुम्ही जीवनातील वास्तविक आनंद उपभोगू शकता.

पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, गणपती कशी करतात आपली इच्छापूर्ती...