आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनि जयंती : दवडू नका सूर्यपुत्राला प्रसन्न करण्याची ही संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय ज्योतिष शास्त्रानुसार शनीला क्रूर ग्रह मानले जाते. असे मानले जाते, की शनिदेव प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ प्रदान करतात. याच कारणामुळे यांना न्यायाधीश म्हटले जाते. तुम्हीही शनिदेवाच्या अशुभ प्रभावामुळे त्रस्त असाल तर 20 मे, बुधवारी येथे सांगण्यात आलेले सोपे उपाय अवश्य करा.

शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शनि अशुभ स्थानामध्ये असतो त्याला आयुष्यात विविध अडचणींना सामोरे जावे लागते. साडेसाती किंवा अडीचकी (अडीच वर्ष शनीचा प्रभाव)स्वरुपात शनि प्रत्येकाच्या जीवनावर प्रभाव टाकत असतो. शनि केवळ अशुभ प्रभाव टाकतो असे नाही, ज्या व्यक्तीवर शनिदेवाची विशेष कृपा राहते त्याला आयुष्यात कोणत्याही प्रकारची अडचण भासत नाही. तुम्हालाही शनीच्या अशुभ प्रभावापासून मुक्त होण्याची इच्छा असेल तर पुढे दिलेले उपाय अवश्य करून पाहा...

धर्म शास्त्रानुसार शनिदेवाची विविध नावे सांगण्यात आली आहेत. शनि जयंतीच्या दिवशी या नावांचे स्मरण करून शनीची पूजा केल्यास जीवनातील सर्व अडचणी समाप्त होतील.

कोणस्थ पिंगलो बभ्रु: कृष्णो रौद्रोन्तको यम:।
सौरि: शनैश्चरो मंद: पिप्पलादेन संस्तुत:।।

अर्थात: 1- कोणस्थ, 2- पिंगल, 3- बभ्रु, 4- कृष्ण, 5- रौद्रान्तक, 6- यम, 7, सौरि, 8- शनैश्चर, 9- मंद आणि 10- पिप्पलाद.

शनिदोष निवारण करण्याचे इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...