आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनीचा उपाय : लोखंडाच्या भांड्यात तांदूळ भरून करा दान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुंडलीमध्ये शनि अशुभ स्थितीमध्ये असेल किंवा शनीची साडेसाती सुरु असेल तर शनिदेवाचे शुभफळ प्राप्त करण्यासाठी येथे सांगण्यात आलेले उपाय करू शकता.

शनिदेवाचे शुभफळ प्राप्त करण्यासाठी काळ्या गायीचे दान करावे. काळे वस्त्र, उडीद, काळे तीळ, चामड्याचे बूट, चप्पल, मीठ, मोहरीचे तेल किंवा धान्य दान केले जाऊ शकते. लोखंडाच्या भांड्यात तंदूर भरून दान करू शकता. कोणत्याही वस्तूचे दान आपल्या श्रद्धा आणि सामर्थ्यानुसार करावे.

दान करताना लक्षात ठेवा या गोष्टी -
1. शनिदेवासाठी दान शनिवारीच करावे. शनिवारी संध्याकाळी दान करणे श्रेष्ठ राहते.
2. एखाद्या गरजू व्यक्तीलाच दान करावे.

शनिदेवाचे इतर काही खास उपाय -
1. शनिवारी एखाद्या गरीब व्यक्तीला तीळ आणि तांदूळ दान करा.
2. शनिवारी श्वानाला पोळी खाऊ घाला.
3. हनुमान चालीसाचे पाठ करावेत. महामृत्युंजय मंत्राचा जप केला जाऊ शकतो.
4. गरीब, वृद्ध आणि सोबत काम करणाऱ्या सहकार्यांशी आदरपूर्वक वागावे.
5. शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावावा.