आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : विदेशी शिष्येसोबत स्मशानात बाबांनी केली शव साधना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उज्जैनच्या चक्रतीर्थ स्मशानात कापालिक तांत्रिक स्वामी भैरवानंद सरस्वती यांनी आपल्या विदेशी शिष्येसोबत स्मशानभूमी जागवली. मध्यरात्री जळत्या चितेसमोर बसून त्यांनी तंत्र साधना केली. यांच्यानुसार, ही साधना करण्यामागचा हेतू म्हणजे सिंहस्थमध्ये जुळून येत असलेल्या चांडाळ योगापासून होणारे अनिष्ट दूर करणे.

चितेच्या चारही बाजूला शिष्यांचा घेरा
स्मशान जागवण्याची अघोर साधना करताना स्वामी भैरवानंद सरस्वतीसोबत त्यांच्या चार शिष्या होत्या. कॅनडातून आलेली त्यांची शिष्या प्रत्यंगिरा सरस्वती आणि डॉ. भुवनेश्वरी यांनी मुख्य सहायकाची जबाबदारी पार पाडली. मध्यरात्री सर्वात पहिले यांनी पूजन सामग्री घेऊन चितेला सजवले आणि नंतर विशेष मंत्राचा उच्चार करत चितेच्या चारही बाजूला एक रेष ओढली. त्यानंतर तंत्र क्रिया सुरु झाली.

चितेला अर्पण केला प्रसाद
उज्जैनची चक्रतीर्थ स्मशानभूमी तंत्र सिद्धीसाठी सिद्ध स्थळ मानले जाते. येथे मध्यरात्री स्वामी भैरवानंद सरस्वती यांची तंत्र क्रिया उशिरापर्यंत चालली. सिद्ध मंत्राचा उच्चार करत त्यांनी जळत्या चीतेमध्ये अनेकदा आहुत्या दिल्या. यानंतर चितेला प्रसाद अर्पण करून सर्वांनी तो ग्रहण केला.

टळणार अनिष्टाचे भय
तंत्र क्रिया समाप्त झाल्यानंतर शिष्यांनी चारही बाजूची रेषा पुसून टाकली आणि सर्वजण बाहेर आले. त्यानंतर स्वामी भैरवानंद यांनी सांगितले की, तंत्र क्रियेचे एक स्वतःचे विज्ञान आहे. याच्या माध्यमातून आम्ही तंत्र क्रियेचे अधिष्ठाता महाकाळला चांडाळ योग दूर करण्याची प्रार्थना केली आहे. आम्हाला विश्वास आहे की, ते आमची प्रार्थना अवश्य ऐकतील.

फोटो : शाहिद खान

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, स्मशानातील तंत्र विधीचे फोटो...