आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवपुराण : एकमुखी रुद्राक्ष धारण करणारा होत नाही गरीब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महादेवाच्या उपासनेचा आणि कृपा प्राप्त करण्याचा महिना श्रावण उद्यापासून (15 ऑगस्ट) सुरु होत आहे. या महिन्यात महादेवाची भक्ती करणाऱ्या व्यक्तीला सर्व सुखांची प्राप्ती होते. या महिन्यात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी काही खास उपाय केले जातात. यामधीलच एक उपाय म्हणजे महादेवाचा दागिना मानला जाणारा रुद्राक्ष धारण करणे. शिवपुराणातील विद्येश्वर संहितेमध्ये रुद्राक्षाचे प्रकार आणि त्यापासून होणारे लाभ तसेच धारण करताना कोणत्या मंत्राचा जप करावा यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. श्रावणाच्या निमित्ताने तुम्ही आम्ही तुम्हाला रुद्राक्षाची विशेष माहिती सांगत आहोत.

रुद्राक्षाची निर्मिती शंकराच्या नेत्रातून झाली अशी कथा आहे. त्रिपुरासूर वधावेळी शंकर अनिमिष दृष्टी लावून बसलेले होते. तेव्हा त्यांच्या नेत्रातून रुद्राक्ष उत्पन्न झाले. अश्रूत मोठी शक्ती असते. अश्रूचे आनंदाश्रू, दु:खाश्रू आणि योगाश्रू असे तीन प्रकार आहेत. शंकराचे अश्रू हे योगाश्रू होते. ज्याने आनंद दिला त्याचे भले करण्याची शक्ती आनंदार्शूत असते. त्याप्रमाणे दुष्टांचे पारिपत्य करण्याची आणि सृष्टीचे रक्षण करण्याची शक्ती योगार्शूत असते. जो रुद्राक्ष धारण करतो त्याच्या ठिकाणी ही शक्ती उत्पन्न होते.

14 प्रकारचे रुद्राक्ष...
शिवपुराणातील विद्येश्वर संहितेमध्ये रुद्राक्षाचे 14 प्रकार सांगण्यात आले आहेत. या सर्वांचे महत्त्व आणि धारण करण्याचे मंत्र वेगवेगळे आहेत. यांना माळेच्या स्वरुपात धारण करण्याचे फळही भिन्न आहेत. हे रुद्राक्ष विधिव्रत पद्धतीने धारण केल्यास विशेष लाभ प्राप्त होतात.

एकमुखी -
एकमुखी रुद्राक्ष साक्षात महादेवाचे स्वरूप आहे. हा भोग आणि मोक्ष प्रदान करतो. ज्या ठिकाणी या रुद्राक्षाची पूजा केली जाते महालक्ष्मी तेथून दूर जात नाही. म्हणजे जो मनुष्य हा रुद्राक्ष धारण करतो त्याला पैशाची अडचण भासत नाही.

मंत्र - ऊँ ह्रीं नम:

पुढे जाणून घ्या, रुद्राक्षाचे इतर प्रकार आणि धारण करण्याचे खास मंत्र..