आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घर असो किंवा वर्कप्लेस, गणेश मूर्तीची स्थापना कोठे केल्याने कसा प्रभाव पडतो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगणेशाला विघ्नहर्ता आणि मंगलकर्ता मानले जाते. श्रीगणेशाच्या पूजेने धन आणि बुद्धी दोन्ही गोष्टींची प्राप्ती होते. याच कारणामुळे कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीलाच श्रीगणेशाचे पूजन केले जाते. सर्व घरामध्ये गणेशाची स्थापना केली जाते. परंतु कोणत्या प्रकारच्या गणेशाची स्थापना केल्याने ते प्रसन्न होतात, हे फार कमी लोकांना माहिती असावे. तुम्हीसुद्धा या गोष्टींपासून अनभिज्ञ असाल तर आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, कोठे कोणत्या प्रकारच्या गणेश मूर्तीची स्थापना करावी आणि श्रीगणेश कशाप्रकारे तुमचे वास्तुदोष दूर करतात...

- सुख, शांती, समृद्धीसाठी पांढर्‍या रंगाची विनायक मूर्ती घरात स्थापन करावी. तसेच या गणपतीची स्थायी प्रतिमा घरात लावावी.

- सर्व मंगल इच्छा पूर्ण करण्यासाठी शेंदुरी रंगाच्या गणपतीची उपासना करावी.

- घरामध्ये पूजेसाठी गणेशाची शयन किंवा बैठी मुद्रा असेल तर अत्यंत शुभ राहते. जर कला किंवा इतर शिक्षणाच्या उद्येशाने पूजन करावयाचे असल्यास नृत्य गणेशाच्या प्रतिमेचे पूजन लाभकारी ठरते.

- घरामध्ये बसलेले डावी सोंड असलेले श्रीगणेश विराजित करावेत. उजव्या हाताकडे सोंड वळलेली असेल तर अशा मूर्तीची उपासना कठीण असते.

- कार्यस्थळावर उभी गणेश मूर्ती विराजित करावी. यामुळे कामाच्या ठिकाणी स्फूर्ती आणि उत्साह निर्माण होईल.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि वाचा, कोठे करावी श्रीगणेशाची स्थापना...