आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपळाच्या 11 पानांच्या या प्राचीन उपायाने प्रसन्न होतात बजरंगबली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शास्त्रानुसार हनुमान चिरंजीव असून लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत. गोस्वामी तुलसीदास रचित श्रीरामचरित मानसनुसार देवी सीतेने पवनपुत्र हनुमानाला अमरतेचे वरदान दिले आहे. कलियुगात हनुमान आपल्या भक्तांच्या इच्छा लगेच पूर्ण करतात. येथे जाणून घ्या, पिंपळाच्या 11 पानांचा एक चमत्कारिक उपाय. हा उपाय मंगळवारी-शनिवारी हनुमानासमोर करावा.

दूर होतील अडचणी -
श्रीरामाचे परमभक्त हनुमानाची कृपा प्राप्त होताच भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. पैशाशी संबंधित अडचणी समाप्त होतात. एखादा आजार असेल तर तोही ठीक होतो. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहदोष असेल तर तो दोषही दूर होतो.
पिंपळाच्या 11 पानांचा उपाय
मंगळवारी ब्रह्म मुहूर्तावर झोपेतून उठून नित्यकर्म पूर्ण करून पवित्र व्हावे. त्यानंतर पिंपळाच्या झाडाची 11 पाने तोडून आणावीत. लक्षात ठेवा, पाने अखंड असावीत. या 11 पानांना स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्यावर कुंकू, चंदन किंवा अष्टगंधाने 'श्रीराम' लिहा.

पुढे जाणून घ्या, या उपायाचा संपूर्ण विधी...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)