आज नवरात्र आणि मंगळवारचा शुभ योग जुळून आला आहे. मंगळवार हा हनुमानाच्या विशेष उपासनेचा दिवस असून नवरात्रीमध्ये देवी दुर्गासोबत हनुमानाचे पूजा केल्यास लवकरच इच्छा पूर्ण होण्याचे योग जुळून येतात. येथे जाणून घ्या, असे काही उपाय जे नवरात्रीमधील मंगळवारी केल्यास अक्षय पुण्य तसेच देवी दुर्गा आणि हनुमानाची कृपा प्राप्त होते.
देवी दुर्गा किंवा हनुमानाला 21 केळी अर्पण करा...
नवरात्र आणि मंगळवारच्या योगात सकाळी किंवा संध्याकाळी पवित्र होऊन देवीच्या मंदिरात 21 केळं घेऊन जावे. देवीच्या मंदिरात जाणे शक्य नसेल तर हनुमानाच्या मंदिरात जाऊ शकता. मंदिरात पोहचल्यानंतर देवीला केळीचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्य दाखवताना दुर्गा देवीच्या मंत्राचा जप करावा.
मंत्र -
या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:॥
लक्षात ठेवा, तुम्ही हनुमानाच्या मंदिरात गेला असाल तर हनुमान चालीसाचे पाठ करावेत. नैवेद्य दाखवल्यानंतर केळी मंदिरात उपस्थित असलेल्या भक्तांना आणि कुमारिकांना प्रसाद स्वरुपात वाटून टाकावी.
पुढे जाणून घ्या, आणखी काही खास उपाय...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)