आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिवारपासून सुरु करा हे सोपे उपाय, यामुळे प्रसन्न होऊ शकतात शनिदेव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्म ग्रंथामध्ये शनिदेवाला न्यायाधीश सांगण्यात आले आहे, म्हणजेच मनुष्याच्या चांगल्या-वाईट कर्माचे फळ देण्याचे काम शनिदेव करतात. यामुळेच असे म्हटले जाते की, ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शनि अशुभ स्थितीमध्ये असेल त्याला जीवनात विविध अडचणींचा सामना करावा लागतो. शनीच्या अशुभ प्रभावामुळे व्यवसायात नुकसान, कामामध्ये अपयश, आपत्य पिडा, शत्रू बाधा, रोगग्रस्त होणे अशा अडचणींना सामोरे जावे लागते.

ज्योतिष शास्त्रानुसार शनीची महादशा, अंतर्दशा किंवा कुंडलीतील लग्न स्थान, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या किंवा आठव्या स्थानात शनि असल्यास शनि पीडेपासून दूर राहण्यासाठी शनि उपासना करणे आवश्यक आहे. जे चांगले काम आणि वृद्धांची, गरिबांची सेवा करतात त्यांच्या कुंडलीत शनि प्रतिकूल असला तरी शुभफळ प्रधान करतो. शनि दोषापासून दूर राहण्यासाठी येथे सांगण्यात आलेला उपाय शनिवारपासून सुरु करावा.

उपाय -
प्रत्येक शानिवारो स्नान करून काळे वस्त्र परिधान करा. त्यानंतर शनिदेवाची येथे सांगण्यात आलेल्या पूजन सामग्रीने पूजा करावी.

- शनिदेवाला काळ्या तिळाचे तेल अर्पण करून अक्षता, काळे तीळ या व्यतिरिक्त काळी (कृष्ण) तुळस अर्पण करावी. शनि दोषापासून मुक्ती मिळवण्याचा हा अचूक उपाय मानण्यात आला आहे.

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, कोणत्या मंत्राचा उच्चार करून शनिदेवाला तुळस अर्पण करावी....
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)