जाणून घ्या, आर्थिक / जाणून घ्या, आर्थिक अडचण दूर करणारा बजरंगबलीचा पूजा उपाय

Feb 11,2014 04:21:00 PM IST
हिंदू धर्म मान्यतांमध्ये हनुमान संकटमोचक देवता आहेत. हनुमान उपासना पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने केल्यास भक्ताच्या सर्व अडचणी दूर होतात असे मानले जाते.
आयुष्यात मनुष्याला वेगवेगळ्या अडचणीतून जावे लागते परंतु आर्थिक अडचणीपासून सर्वजण दूर राहण्याचा प्रयत्न करत असतात. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी हनुमान भक्तीचा विशेष दिवस मंगळवारी येथे सांगण्यात आलेला एक सोपा पूजा उपाय करून पाहा. या उपायाने तुमची आर्थिक अडचण दूर होईल तसेच संकटामधून मुक्ती मिळेल.
पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या, आर्थिक अडचण दूर करण्याचा खास पूजा उपाय...
- सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छा लाल रंगाचे वस्त्र परिधान करून हनुमानाची पूजा करावी. - पूजा करताना हनुमानाला शेंदूर, लाल अक्षता, कुंकू, फुल अर्पण करावे. - पूजा झाल्यांनतर हनुमानाला शेंदूर लावलेले एक नारळ अर्पण करावे. - नारळ अर्पण करताना हनुमान चाळीसामधील खालील ओवीचे स्मरण करावे. जै जै जै हनुमान गौसाईं, कृपा करहु गुरु देव की नाईं। हनुमानाकडे केवळ धनाची नाही तर जीवनातील प्रत्येक संकटातून रक्षा करण्याची प्रार्थना करून आरती करावी.
X