आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांडाळ योग निष्प्रभ करण्यासाठी तांत्रिक शिवानी दुर्गाने जळत्या चितेसमोर केली पूजा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईच्या अघोरी तांत्रिक शिवानी दुर्गाने बुधवारी रात्री उज्जैनच्या चक्रतीर्थ स्मशानभूमीत मसानी काली पूजा केली. या पूजेमुळे सिंहस्थ मेळ्यावर कोणताही वाईट प्रभाव पडणार नाही असे त्यांनी सांगितले. चांडाळ योगाचा प्रभाव राहणार नाही आणि सिंहस्थ कुंभमेळा यशस्वीपणे पार पडेल. जवळपास दोन तास जळत्या चितेसमोर शिवानी यांनी पूजा केली. कशाप्रकारे केली चितेवर पूजा...

ग्लासमध्ये मद्य भरून दाखवला नैवेद्य
त्यांनी स्मशानभूमीत प्रवेश करताच चितेच्या ठिकाणी भाला, चाकू इ. वस्तू काढून ठेवल्या. ग्लासात दारू भरून नैवेद्य दाखवला. मंत्रोच्चार करत पूजा सुरु केली. थोड्यावेळाने चिता आणि संपूर्ण पूजन सामग्रीच्या चारही बाजूने तलवारीने लक्ष्मण रेषा ओढली आणि सर्वांना दूर थांबण्यास सांगितले.

कोणत आहेत अघोरी तांत्रिक शिवानी दुर्गा
- शिवानी यांनी शिकागो विद्यापीठातून पीएचडी केली आहे. त्यानंतर नागनाथ योगेश्वर गुरूंकडून अघोर तंत्राची विद्या प्राप्त केली.
- यांना लहानपणापासूनच चितेजवळ बसने आवडत होते.
- रहस्यमय तंत्र शक्तीचा सखोल ज्ञान आहे. या भारतीय आणि पाश्चिमात्य तंत्र शक्ती जोडून नवीन प्रयोग करत आहेत.
- यांच्यानुसार यानी अघोर सायकिक नावाचे एक नवीन तंत्रसुद्धा विकसित केले आहे.
- शिवानी दुर्गा मुंबई येथे सर्वेश्वर शक्ती इंटरनॅशनल वुमन आखाडा नावाची एक संस्था देखील चालवतात.
- यांचे 11 देशांमध्ये अनेक भक्त असून ते सिंहस्थमध्ये सहभागी होणार आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, तांत्रिक शिवानी दुर्गा यांचे काही खास फोटो...