आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनि अमावस्या : करा शनि यंत्राची स्थापना आणि पूजा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर तुमच्या कुंडलीत शनि अशुभ स्थानावर असेल किंवा तुम्हाला साडेसाती सुरु असेल तर आज (26 जुलै, शनिवार) शनि अमावस्या शनिदेवाला प्रसन्न करण्याचा खास दिवस आहे. आज शनि यंत्र स्थापन करून नियमित या यंत्राची पूजा केल्यास सर्व अडचणी दूर होऊन साडेसातीचा प्रभाव कमी होतो.

अशी करावी पूजा..
श्रद्धापूर्वक शनि यंत्राची स्थापना करून दररोज या यंत्रासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. निळे फुल अर्पण केल्यास लाभ होईल. दररोज शनि स्तोत्र आणि ऊं शं शनैश्चराय नम: या मंत्राचा जप करावा.
मृत्यू, कर्ज, न्यायालयातील खटले, हानी, आजार, विविध अडचणींमुळे त्रस्त असलेल्या लोकांसाठी शनि यंत्राची पूजा खूप फायदेशीर आहे. नोकरी करणाऱ्या लोकांच्या उन्नतीसाठी शनि यंत्राची पूजा खूप उपयोगी आहे.