आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत शनिदेवाला प्रसन्न करण्याचे 18 तांत्रिक उपाय, कोणताही एक अवश्य करा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उद्या (२८ मे, बुधवार) शनि जयंती आहे. धर्म ग्रंथानुसार शनिदेवाला न्यायाधीशाचे पद प्राप्त आहे. मनुष्याच्या चांगल्या-वाईट कर्मानुसार शनिदेव फळ प्रदान करतात. ज्या व्यक्तीवर शनीची वक्रदृष्टी पडते, त्याला विविध अडचणींना सामोरे जावे लागते तर ज्या व्यक्तीवर शनिदेव प्रसन्न होतात तो व्यक्ती सुखी आयुष्य जगतो.

धर्म ग्रंथानुसार शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी काही विशेष उपाय केल्यास लवकर शुभफळ प्राप्त होते. शनि जयंतीच्या निमित्ताने आम्ही तुम्हला शनिदेवाला प्रसन्न करण्याचे काही खास तांत्रिक उपाय सांगत आहोत. या उपायांनी शनिदेव केवळ प्रसन्न होणार नाहीत तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील.

उपाय
1 - काळ्या गाईची सेवा केल्यास शनिदेव प्रसन्न होतात. शनि जयंतीच्या दिवशी काळ्या गाईची पूजा करा आणि प्रदक्षिणा घालून बुंदीचे चार लाडू खाऊ घाला. हा उपाय तुम्ही केव्हाही तुमच्या इच्छेनुसार करू शकता.

2 - शनि जयंतीच्या दिवशी सूर्यास्तानंतर हनुमानाची पूजा करा. पूजेमध्ये शेंदूर, काळे तीळ, तिळाचे तेल, या तेलाचा दिवा आणि निळ्या फुलांचा समावेश करावा. हा उपाय तुम्ही प्रत्येक शनिवारी करू शकता.