हिंदू धर्मामध्ये शकुन-अपशकून या मान्यता पूर्वीपासून चालत आल्या आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार या मान्यता
आपल्या जवळपास असलेल्या पशु-पक्षी, प्राण्यांशी देखील संबधित आहेत. कावळा आणि घुबड यांच्याशी संबधित शकुन-अपशकून आपल्या समाजात जास्त प्रमाणात आहेत. कावळा सहजपणे दृष्टीस पडतो परंतु घुबड फार कमी प्रमाणात दिसून येते. परंतु घुबड दिसणे किंवा त्याचा आवाज ऐकू आला तर ज्योतिष शास्त्रानुसार आपल्यासाठी हा चांगला शकुन किंवा अपशकून ठरू शकतो.
शकुन शास्त्रानुसार घुबड आणि कावळ्याचे काही संकेत आपल्यासाठी शुभ तर काही अशुभ असतात. यामुळे आपल्याला कधी घुबड, कावळा दिसला किंवा त्यांचा आवाज ऐकू आला तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.
जाणून घ्या, घुबड आणि कावळ्याशी संबंधित काही शकुन-अपशकून...
1 - जर घुबड एखाद्या घरावर वारंवार येउन बसत असेल तर त्या घराच्या मालकावर एखादे संकट येण्याची शक्यता वाढते. दक्षिण आफ्रिकेमध्ये घुबडाच्या आवाजाला मृत्यू सूचक मानले जाते. चीनमध्ये घुबड दिसणे शेजा-याच्या मृत्यूचे सूचक मानले जाते.
2 - जर खूप प्रमाणात कावळे एकत्रित होऊन आवाज करत असतील तर त्या गावावर एखादे भारी संकट येते. एखाद्या घरावर बसून कावळे आवाज करीत असतील तर त्या घराच्या मालकाला एखाद्या मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर काही खास संकेत...