आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These Is Small Architectural Measures, Will Be Give Big Advantage

PHOTOS : हे छोटे-छोटे वास्तू उपाय केल्यास होतील मोठमोठे फायदे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनात अडचणी येत-जात असतातच. यामधील काही अडचणी घरातील वास्तूदोषामुळे निर्माण झालेल्या असू शकतात. हे वास्तुदोष छोटे-छोटे उपाय करून दूर केले जाऊ शकतात. हे उपाय जास्त खर्चिक नाहीत आणि यासाठी घराची तोडफोड करण्याचीही आवश्यकता नाही. आज आम्ही तुम्हाला काही छोटे-छोटे वास्तू उपाय सांगत आहोत. हे उपाय केल्यास सकारात्मक परिणाम दिसून येतील.

- घरामधील घड्याळ बंद पडले असेल तर ते घरातून काढून टाका किंवा दुरुस्त करून घ्या. बंद घड्याळ घरातील वास्तूला प्रभावित करते. यामुळे नकारात्मक उर्जा निर्माण होते. घराच्या पूर्वोत्तर कोपर्यात तलाव किंवा कारंजा असणे शुभ असते. या पाण्याचा प्रवाह घराकडे असावा.

- घर, दुकान किंवा ऑफिसमधील तिजोरीवर लक्ष्मी आणि गणपतीची प्रतिमा लावावी. दुकान उघडताच लक्ष्मीची पूजा करून खुर्चीवर बसावे.

- घराच्या उतार-पूर्व भागात तुळस, मनीप्लांट, चमेली यासारखी झाडे कुंडीत लावा. या उपायाने घरातील नकारात्मक उर्जा नष्ट होईल.