आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवीला प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीमध्ये करू शकता देवी भागवतामधील हे उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या चैत्र नवरात्रीच्या उत्सव चालू असून 28 मार्चला शनिवारी समाप्ती आहे. शास्त्रामध्ये विविध प्रकारे देवीची उपासना करण्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. देवी भागवत (स्कंद 11, अध्याय 12) मध्ये दिलेल्या माहितीनुसार विविध प्रकारच्या रसांनी देवीला अभिषेक केल्यास देवी अतिप्रसन्न होते. येथे जाणून घ्या, कोणत्या रसाने देवीला अभिषेक केल्यास त्याचे कोणते फळ प्राप्त होते.

1. देवी जगदंबिकेला आंबा किंवा ऊसाच्या रसाने अभिषेक केल्यास देवी लक्ष्मी आणि सरस्वती अशा भक्ताचे घर सोडून कधीही जात नाहीत. अशा घरांमध्ये नेहमीच संपत्ती आणि विद्येचा वास राहतो.

2. वेदपाठासोबतच कापूर, अगरु (सुगंधित वनस्पती) केशर, कस्तुरी व कमळाच्या पाण्याने देवीला अभिषेक केल्यास सर्व प्रकारच्या पापांचा नाश होतो. साधकाला थोड्या प्रयात्नांतच यश प्राप्त होते.

पुढे जाणून घ्या, इतर कोणत्या रसांनी देवीला अभिषेक केल्यास कोणते फळ प्राप्त होते....