आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजेचा धक्का लागून विद्यार्थिनीचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - मध्यान्ह भोजनासाठी शाळेतून मैत्रिणीच्या घरी जेवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थिनीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही दुर्घटना गुरुवारी दुपारी दीड वाजता शेलगाव (ता. कळंब) येथे घडली. पल्लवी शिवाजी माने (13) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती जिल्हा परिषद शाळेत सातवीमध्ये शिकत होती. शाळेला सुटी झाल्यानंतर मैत्रीण प्रांजली दिवाणेच्या घरी जेवण करण्यासाठी गेली होती. भोजनानंतर ताटातील पाणी पल्लवीकडून घराबाहेरील विजेच्या तारेवर पडले. तार घराच्या अत्यंत जवळ असल्याने तिला विजेचा जोरदार धक्का बसला.