आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या मंत्र उपायाने इंटरव्ह्यूमध्ये मिळू शकते यश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरव्ह्यूचे नाव ऐकताच भल्याभल्यांना घाम फुटतो. प्रत्येकाच्या मनात एकच विचार असतो की इंटरव्ह्यूमध्ये कोणते प्रश्न विचारले जातील. त्या प्रश्नांची मला उत्तरे देत येतील की नाही. अशा विविध प्रश्नांमुळे इंटरव्ह्यूला जाणारा व्यक्ती नर्वस होतो. तुम्हीही इंटरव्ह्यू देण्यासाठी जाणार असाल तर यशस्वी होण्यासाठी खालील उपाय करून पाहा.

उपाय
एखाद्या शुभ-चांगल्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करून पवित्र व्हा. त्यानंतर आसनावर पूर्व दिशेकडे तोंड करुन बसावे. समोर एक पिवळा कपडा अंथरून त्यावर १०८ मण्यांची स्फटीक माळ आणि त्यावर केशर आणि अत्तर शिंपडून त्याची पुजा करावी. त्यानंतर धूप-दीप लावून खाली दिलेल्या मंत्राचा ३१ वेळेस जप करावा.

हा उपाय सलग आकरा दिवस केल्याने माळ सिद्ध होईल. इंटरव्ह्यूला जाताना ही माळ गळ्यात घालावी. या उपायाने निश्चितच तुम्हाला यश मिळेल.

मंत्र
ऊँ ह्रीं वाग्वादिनी भगवती मम कार्य सिद्धि कुरु कुरु फट् स्वाहा।
बातम्या आणखी आहेत...