आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज शुभ योगात करा हे उपाय, प्रसन्न होतील हनुमान आणि शनिदेव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्म ग्रंथानुसार चैत्र मासातील पौर्णिमेला हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. या वर्षी हा उत्सव 4 एप्रिल, शनिवारी आहे. शनिवारी हनुमान जयंतीचा शुभ योग जुळून आल्यामुळे या दिवशी करण्यात आलेल्या उपायांनी ने केवळ हनुमान प्रसन्न होतील तर शनिदेवाचाही आशीर्वाद प्राप्त होईल. या दिवशी हनुमान तसेच शनिदेव दोघांशी संबंधित उपाय केले जाऊ शकतात. येथे जाणून घ्या, हनुमान आणि शनिदेवाला प्रसन्न करणारे काही खास उपाय....

1. हनुमान जयंतीला हनुमानाला शेंदूर आणि लाल वस्त्र अर्पण केले जाते. हनुमानाला वस्त्र अर्पण करण्यापूर्वी स्वतः स्नान करून शुद्ध व्हावे. त्यानंतर लाल रंगाचे धोतर परिधान करावे. वस्त्र अर्पण करण्यासाठी चमेलीच्या तेलाचा उपयोग करावा. हनुमानासमोर चमेलीच्या तेलाचा एक दिवा लावून ठेवावा. लाल वस्त्र अर्पण केल्यानंतर हनुमानाला गुलाबाच्या फुलांचा हार अर्पण करून केवड्याचे अत्तर लावावे. त्यानंतर गुळ आणि शेंगदाण्याचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्य दाखवल्यानंतर त्याच ठिकाणी बसून तुळशीच्या माळेने खालील मंत्राचा कमीत कमी पाच माळ जप करावा.

मंत्र -
राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे।
सहस्त्र नाम तत्तुन्यं राम नाम वरानने।।

जप झाल्यानंतर हनुमानाला अर्पण केलेल्या गुलाबाच्या हारातील एक फुल तोडून लाल कपड्यात बांधून धन स्थानावर ठेवा. या उपायाने तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही.

हनुमान आणि शनिदेवाला प्रसन्न करण्याचे इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....