आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंब आणि धनावर प्रभाव टाकतो उत्तर दिशेचा वास्तुदोष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरातील विभिन्न दिशांचा वास्तुदोष कुटुंबातील सदस्यांना प्रभावित करतो. आज आम्ही तुम्हाला कोणत्या दिशेला वास्तुदोष असल्यास त्याचा कुटुंबातील सदस्यांवर कसा प्रभाव पडतो याची खास माहिती सांगत आहोत.

1- उत्तर दिशेच्या वास्तुदोषाचा प्रभाव घरातील महिला आणि कुटुंबाच्या उत्पन्नावर पडतो.
2- ईशान्य कोपर्‍यातील (उत्तर-पूर्व) वास्तुदोषाचा प्रभाव घराच्या मालकावर आणि तेथे राहणार्‍या इतर पुरुषांवर आणि त्यांच्या आपत्यांवर पडतो. मुलांमध्ये विशेषतः पहिल्या मुलावर याचा प्रभाव जास्त पडतो.
3- पूर्व दिशेला वास्तुदोष असेल तर याचा प्रभावही मुलांवरच पडतो.
4- आग्नेय कोपर्‍यातील (दक्षिण-पूर्व) वास्तुदोषाचा प्रभाव घरातील स्त्रिया, मुले विशेषतः दुसर्‍या मुलावर जास्त पडतो.
5- दक्षिण दिशेच्या वास्तुदोषाचा प्रभाव घरातील स्त्रियांवर जास्त प्रमाणावर राहतो.
6- नैऋत्य कोपर्‍यातील (पश्चिम-दक्षिण) वास्तुदोषाचा प्रभाव कुटुंबातील प्रमुख व्यक्ती त्यांची पत्नी आणि मुलांवर पडतो.
7- जर पश्चिम दिशेला एखाद्या प्रकारच्या वास्तुदोष असेल तर याचा प्रभाव घरातील पुरुषांवर पडतो.
8- वायव्य कोपर्‍यातील (पश्चिम-उत्तर) वास्तुदोषाचा प्रभाव घरातील स्त्रिया आणि तिसर्‍या आपत्यावर पडतो.

पुढे जाणून घ्या, वास्तुदोषाशी संबंधित इतर काही खास माहिती...
बातम्या आणखी आहेत...