आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वास्तू : रात्री कोणत्या वेळी गुप्त स्थानावर ठेवावे धन ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वास्तुशास्त्र पंचतत्त्वांवर आधारित आहे. पृथ्वी (क्षिति), जल (आप्), अग्नि (ताप), वायु (पवन) व आकाश (शून्य) यांना पंचतत्त्व अथवा पंचमहाभूते म्हणून ओळखले जाते. सूर्यदेवालाही अग्नीचे स्वरूप मानण्यात आले आहे. यामुळे सूर्यही वास्तुशास्त्राला प्रभावित करतो. यामुळे सूर्योदयापासून सूर्यास्त होण्यापर्यंतची दिशा आणि वेळेनुसार घर बांधावे आणि आपली दिनचर्या निर्धारित करावी. वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आपण कोणत्या वेळी कोणते काम करावे...
1- वास्तुशास्त्रानुसार मध्यरात्रीनंतर पहाटे 3 वाजेपर्यंत सूर्य पृथ्वीच्या उत्तर भागात असतो. हा काळ अत्यंत गोपनीय असतो. ही दिशा आणि वेळ पैसा, किमती वस्तू किंवा दागिने गुप्त स्थानावर ठेवण्यासाठी उत्तम आहे.
2- सूर्योदयापूर्वी पहाटे 3 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत ब्रह्म मुहूर्त असते. या काळात सूर्य पृथ्वीच्या उत्तर-पूर्व भागामध्ये असतो. हा काळ चिंतन-मनन व अभ्यासासाठी उत्तम आहे.
3- सकाळी 6 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत सूर्य पृथ्वीच्या पूर्व भागात असतो. या काळात सूर्यप्रकाश घरात येईल अशाप्रकारे घराचे बांधकाम करावे.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, वास्तुशास्त्रानुसार कोणत्या वेळेला कोणते काम करणे उपयुक्त ठरते....