आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या दिशेला बसून जेवण केल्यास प्राप्त होते दीर्घायुष्य आणि लक्ष्मी कृपा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वास्तू सकारात्मक आणि नकारात्मक उर्जा सिद्धांतावर काम करते. वास्तू नियमांचे पालन करताना आवश्यक कामामध्ये दिशांकडे लक्ष दिल्यास घरातील वातावरण शुभ राहते. येथे जाणून घ्या, वास्तूच्या टिप्स, ज्यामुळे घरातील सकारात्मक उर्जा वाढते...

जेवताना लक्षात ठेवा या गोष्टी -
1. वास्तू मान्यतेनुसार पूर्व दिशेला मुख करून जेवण केल्यास आयुष्य वाढते
2. जे लोक उत्तरेकडे मुख करून जेवण करतात, त्यांना दीर्घ आयुष्यासोबत लक्ष्मी कृपा प्राप्त होते .
3. दक्षिण दिशा, यमाची दिशा मानण्यात आली असून या दिशेला मुख करून जेवण केल्यास भीती वाढते. वाईट स्वप्न पडतात.
4 पश्चिम दिशेकडे तोंड करून जेवण केल्यास अन्नाचा आरोग्याला फायदा होत नाही. लक्षात ठेवा, उत्तर किंवा पूर्व दिशेला मुख करूनच अन्न ग्रहण करावे.
5. नेहमी जमिनीवर बसूनच जेवण करावें.

दिशा आणि वास्तुनुसार दिशांची नावे
उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम दिशांसोबतच आणखी चार दिशा सांगण्यात आल्या आहेत. उत्तर-पूर्व दिशेला ईशान्य कोणा मानले जाते. उत्तर-पश्चिमला वायव्य कोणा, दक्षिण-पूर्व दिशेला आग्नेय कोणा आणि दक्षिण-पश्चिम दिशेला नैऋत्य कोन म्हटले जाते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर काही वास्तू टिप्स...
बातम्या आणखी आहेत...