आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 15 गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास प्रत्येक कामात मिळेल शुभफळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वास्तू सकारात्मक आणि नकारात्मक उर्जा सिद्धांतावर काम करते. घरामध्ये एखादी वस्तू चुकीच्या ठिकाणी असल्यास त्यामुळे नकारात्मक उर्जा वाढते. घरामध्ये नकारात्मक उर्जा असल्यास तेथील लोकांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागू शकते. वास्तू नियमांचे पालन केल्यास घरातील वातावरण शुभ राहते. येथे जाणून घ्या, वास्तूच्या टिप्स, ज्यामुळे घरातील सकारात्मक उर्जा वाढते...

1- घराच्या अंगणात दरवाजासमोर तुळस लावावी. सकाळी तुळशीला जल अर्पण करावे. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा. पूर्व किंवा उत्तर दिशेला तुळस लावल्यास आत्मविश्वास वाढतो.
2- घराचा मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेला असणे श्रेष्ठ राहते, परंतु असे नसेल तर घराच्या दरवाजावर स्वस्तिक, श्रीगणेशाचे चिन्ह लावावे.
3- घरामध्ये खिडक्या, दरवाजांची संख्या सम असावी. सम म्हणजे 2, 4, 6, 8 किंवा 10. दरवाजे, खिडक्या घराच्या आतील बाजूस उघडली जातील अशी व्यवस्था करावी.
4- घरामध्ये व्यर्थ, जड सामान ठेवू नये. या वस्तूंमुळे घरातील तणाव वाढू शकतो.
5- आर्थिक लाभ प्राप्त करण्याची इच्छा असेल तर तिजोरीचे मुख उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे. धनाचे स्थान सुगंधित ठेवावे. यासाठी उदबत्ती, धूप, अत्तरचा उपयोग केला जाऊ शकतो.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर काही वास्तू टिप्स...