पंचतत्त्वापासून
आपले शरीर बनते आणि पंचतत्त्वापासूनच आपले घरही तयार होते. जल, वायू, अग्नी, पृथ्वी आणि आकाश हे पाच तत्त्व आहेत. या तत्त्वांचा प्रभाव आपल्यावर आणि आपल्या घरावरही असतो. घरामध्ये या पाच तत्त्वांच्या संतुलानामुळे सकारात्मक उर्जेचे संतुलन कायम राहते. घरातील वेगवेगळ्या दिशांना या पाच तत्त्वांची उपस्थिती राहते. येथे जाणून घ्या, या पाच तत्त्वांमधील पहिल्या जल तत्त्वाला घरामध्ये कशाप्रकारे संतुलित केले जाऊ शकते...
जलतत्त्व - घराच्या उत्तर भागात जल तत्त्वाचा प्रभाव असतो. पाण्याच्या स्वभावाच वाहत पुढे जाने असा आहे. याच कारणामुळे पाणी स्वच्छता कारक आहे.
जलतत्त्व संतुलित असल्यास कसा प्रभाव पडतो...
- घरामध्ये जलतत्त्व संतुलित असल्यास कुटुंबातील सदस्यांचे विचार उच्च राहतात.
- आयुष्यात उन्नतीच्या संधी येत राहतात.
- घरातील सर्व सदस्य कर्मठ बनतात.
- कठीण परिस्थितीचा सामना करण्याची शक्ती वाढते.
- अशा घरामध्ये वास्तव्य करणारे लोक अध्यात्मिक असण्यासोबतच संसारिक कामामध्ये निपुण असतात.
पुढे जाणून घ्या, जलतत्त्व असंतुलित असल्यास कोणकोणते वाईट प्रभाव पडू शकतात....
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)