Home | Jeevan Mantra | Jyotish | Vastu Shastra | Vastu Tips To Avoid Negativity

निगेटिव्हिटी नष्ट करून घर-दुकान आनंदाने भरून टाकतील या 10 वास्तू टिप्स

जीवनमंत्र डेस्क | Update - May 31, 2017, 01:03 PM IST

वास्तू सकारात्मक आणि नकारात्मक उर्जा सिद्धांतावर काम करते. घरामध्ये एखादी वस्तू चुकीच्या ठिकाणी असल्यास त्यामुळे नकारात्मक उर्जा वाढते.

 • Vastu Tips To Avoid Negativity
  वास्तू सकारात्मक आणि नकारात्मक उर्जा सिद्धांतावर काम करते. घरामध्ये एखादी वस्तू चुकीच्या ठिकाणी असल्यास त्यामुळे नकारात्मक उर्जा वाढते. घरामध्ये नकारात्मक उर्जा असल्यास तेथील लोकांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागू शकते. वास्तू नियमांचे पालन केल्यास घरातील वातावरण शुभ राहते. येथे जाणून घ्या, वास्तूच्या टिप्स, ज्यामुळे घरातील सकारात्मक उर्जा वाढते...

  1- घरामध्ये खिडक्या, दरवाजांची संख्या सम असावी. सम म्हणजे 2, 4, 6, 8 किंवा 10. दरवाजे, खिडक्या घराच्या आतील बाजूस उघडली जातील अशी व्यवस्था करावी.

  2- घरामध्ये व्यर्थ, जड सामान ठेवू नये. या वस्तूंमुळे घरातील तणाव वाढू शकतो.

  पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर काही वास्तू टिप्स....

 • Vastu Tips To Avoid Negativity
  3- आर्थिक लाभ प्राप्त करण्याची इच्छा असेल तर तिजोरीचे मुख उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे. धनाचे स्थान सुगंधित ठेवावे. यासाठी उदबत्ती, धूप, अत्तरचा उपयोग केला जाऊ शकतो.

  4- तिजोरीच्या दरवाजावर कमळावर विराजमान असलेल्या महालक्ष्मीचा फोटो लावावा.
 • Vastu Tips To Avoid Negativity
  5- दक्षिण दिशेला आरसा लावू नये. आरसा पूर्व किंवा उत्तर दिशेच्या भिंतीवर लावावा.

  6- घराचा मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेला असणे श्रेष्ठ राहते, परंतु असे नसेल तर घराच्या दरवाजावर स्वस्तिक, श्रीगणेशाचे चिन्ह लावावे.
 • Vastu Tips To Avoid Negativity
  7- घराच्या अंगणात दरवाजासमोर तुळस लावावी. सकाळी तुळशीला जल अर्पण करावे. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा. पूर्व किंवा उत्तर दिशेला तुळस लावल्यास आत्मविश्वास वाढतो.

  8- भिंतीला भेगा पडल्या असतील त्या भरून घ्याव्यात.
 • Vastu Tips To Avoid Negativity
  9- घरामध्ये कोळ्याचे जाळे, घाण, कचरा होऊ देवू नये. यामुळे राहू ग्रहाचे अशुभ फळ प्राप्त होतात.

  10- संध्याकाळी घरामध्ये अंधार राहणार नाही याची काळजी घ्यावी.

Trending