आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Worship Of Lord Shiv For Be Prosperous In Shravan

श्रावण : या उपायाने जीवनातील कलह, आर्थिक अडचणी दूर होऊन प्राप्त होईल सुख-समृद्धी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्म मान्यतेमध्ये भगवान शिव काळाचेही काळ म्हणजे महाकाळ स्वरुपात पूजनीय आहेत. विशेषतः संध्याकाळची वेळ महादेव भक्तीसाठी शुभ मानली जाते. असे मानले जाते की, या काळात महादेव आपल्या गणांसोबत भ्रमण करण्यासाठी निघतात. यामुळे हा शुभ काळ संसारिक जीवांसाठी शिव कृपा प्राप्त करण्याचा श्रेष्ठ काळ मानला गेला आहे.

सुखी जीवन जगणे ही मनुष्याची स्वाभाविक भावना असते, ज्यासाठी देव उपासना हा उत्तम उपाय मानण्यात आला आहे. धर्म ग्रंथानुसार महादेवाचे स्मरण जीवनाचे कल्याण आणि सर्व सुख-समृद्धी प्राप्त करून देणारे मानले जाते.

हिंदू धर्म प्रथांमध्ये महादेवाचे स्मरण करण्यासाठी श्रावण महिना शुभ मानला गेला आहे. तसेच श्रावण महिन्यातील सोमवार हा शिव कृपा प्राप्त करण्याचा उत्तम दिवस आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करा आणि जाणून घ्या, गृह कलह आणि आर्थिक अडचणीतून मुक्त करणारे 2 विशेष मंत्र उपाय...