आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Remedies Of Shiva Worship For Various Problems Of Life

शिवलिंगावर असे तांदूळ अर्पण केल्यास प्राप्त होते लक्ष्मीची कृपा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये महादेवाला संसारिक सुखाशी संबंधित सर्व इच्छा पूर्ण करणारे देवता मानण्यात आले आहेत. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी धर्मग्रंथांमध्ये विविध व्रत-उपवास सांगण्यात आले आहेत. अनेक भक्त वेगवेगळ्या कारणांमुळे व्रताच्या धार्मिक गोष्टींचे पालन करू शकत नाहीत. जे भक्त व्रत करण्यास असमर्थ असतील त्यांच्यासाठी शिवपुराणात एक उपाय सांगण्यात आला आहे. या उपायानुसार वेगवेगळ्या प्रकारचे धान्य शिवलिंगावर अर्पण करून तुम्ही सौभाग्य, सुख-समृद्धी, धन आणि सर्व सुख प्राप्त करू शकता.

उपाय करण्यापूर्वी सर्वात पहिले महादेवाची चंदन, बिल्वपत्र, फुल, पांढरे वस्त्र अर्पण करून पूजा करावी. त्यानंतर येथे सांगण्यात आलेले धान्य आणि फुल अर्पण करावे. येथे जाणून घ्या, कोणते धान्य आणि फुल अर्पण केल्याने कोणती इच्छा पूर्ण होते. या गोष्टी अर्पण करताना खालील मंत्राचे स्मरण करणे शुभ राहते...

मृत्युंजयाय रुद्राय नीलाकंताया शम्भवे।
अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः।।

देव पूजेत अक्षता म्हणजे तांदूळ अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. शिव पूजेमध्ये शिवलिंगावर अखंड तांदूळ अर्पण केल्यास लक्ष्मी कृपेने धनलाभ होतो.

पुढे जाणून घ्या, शिव पूजेचे आणखी काही खास उपाय....