आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेंदी हातांचे सौंदर्यच वाढवत नाही तर अनेक रोगांवर आहे रामबाण उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेंदी लावण्याची प्रथा भारतात आदीम कालापासून आहे. सर्वच वयातील महिलांना मेंदीचे पान मोहिनी घालत असते. देशातील सर्वच भागात मेंदी लावण्याची प्रथा आहे. सहसा सणाच्या दिवशी महिला मेंदी लावतात किंवा पूजेत मेंदीचा वापर करतात. मात्र मेंदी औषधी म्हणूनही वापरता येते हे फार कमी लोकांना माहिती असते.

तोंडातील फोडांवर रामबाण उपाय- मेंदीची पाने रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी त्या पाण्याने गुळणा केल्याने तोंडातील फोड लवकरच कमी होतात.

दाढ दूखी कमी होते- मेहंदीचे पानाची पेस्ट करून लावल्याने दाढ दूखी कमी होते.

भेगा नाहिशा होतात- खोबरेल तेलात मेंदी एकत्र करून लावल्याने तळपायाच्या भेगा कमी होतात.

पायाची आग कमी होते- मेंदी किटाणू आणि बुरशीचा नाश करते. शरीराचे तापमान नियंत्रीत ठेवते. त्यामुळे उष्णतेमुळे होणारी पायांची आग कमी होते.