4 अनोखे मंदिर / 4 अनोखे मंदिर : येथे भक्तांसमोर दारू पिते भगवान भैरवाची मूर्ती

जीवनमंत्र डेस्क

Nov 11,2017 12:05:00 PM IST
आज काळभैरव अष्टमी आहे. या दिवशी भैरवाची विशेष पूजा केली जाते. या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला भैरवाच्या अशा 4 मंदिराची माहिती देत आहोत, जेथे देवाला दारूचा नैवेद्य दाखवला जातो. एवढेच नाही तर भक्तांनी अर्पण केलेली दारू काळभैरव सर्वांसमोर ग्रहण करतात.

1. काळभैरव मंदिर (मध्यप्रदेश)
मध्यप्रदेशची धार्मिक नगरी उज्जैनमध्ये विविध प्राचीन आणि अनोखे मंदिर आहेत. यामधीलच एक काळभैरवाचे मंदिर आहे. या मंदिरात देवाला दारूचा नैवेद्य दाखवला जातो. ही दारू काळभैरव ग्रहणही करतात. नैवेद्य दाखवल्यानंतर भक्ताना प्रसाद स्वरूपात दारू दिली जाते. अनेक लोकांनी मूर्तीच्या खाली आणि मंदिर परिसरात अर्पण केलेली दारू कुठे जाते याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु काहीही आढळून आले नाही. यामुळे हे देवाचा चमत्कार मानला जातो.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर मंदिराविषयी...
2. काळभैरव मंदिर (गुजरात) गुजरातमध्ये भुज शहराजवळ भगवान भैरवाचे एक प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर भैरवाच्या इतर मंदिरांपेक्षा खास आहे, कारण येथे देवाला विशेष दारूचा नैवेद्य दाखवला जातो. भगवान भैरवाच्या इतर मंदिरांमध्ये कोणताही ब्रँडची दारू अर्पण केले जाते परंतु या मंदिरात केवळ विदेशी ब्रँडची दारू अर्पण करण्याची प्रथा आहे.3. भैरव नाथ मंदिर (उत्तराखंड) भगवान भैरवाचे हे मंदिर केदारनाथ मंदिराजवळ स्थित आहे. धार्मिक दृष्टीने हे मंदिर फार महत्त्वाचे आहे. हिमवृष्टी काळात केदारनाथ मंदिर बंद असल्यास भैरव मंदिर मुख्य मानून येथे महादेवाची पूजा केली जाते. मान्यतेनुसार येथे स्थापित भैरवाला वैष्णो देवीचे वरदान प्राप्त आहे. यामुळे जो भक्त वैष्णवी देवीचे दर्शन करतो त्याला येथे येऊन भैरवाचे दर्शन घेणे अनिवार्य आहे. केदारनाथ भैरव दर्शनाशिवाय वैष्णो देवी यात्रा अपूर्ण मानली जाते.4. खबीस बाबा मंदिर (उत्तरप्रदेश) उत्तरप्रदेशातील सीतापूरचे खबीस बाबा मंदिर देशातील अनोखा प्रसाद वाटले जाणारे मंदिर आहे. येथे लाखो भाविक नवस बोलण्यासाठी येतात. खबीस बाबा भैरवाचेच एक रूप मानले जातात. या मंदिरातही दारूचा नैवेद्य दाखवला जातो आणि प्रसाद स्वरूपात वाटला जातो.

2. काळभैरव मंदिर (गुजरात) गुजरातमध्ये भुज शहराजवळ भगवान भैरवाचे एक प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर भैरवाच्या इतर मंदिरांपेक्षा खास आहे, कारण येथे देवाला विशेष दारूचा नैवेद्य दाखवला जातो. भगवान भैरवाच्या इतर मंदिरांमध्ये कोणताही ब्रँडची दारू अर्पण केले जाते परंतु या मंदिरात केवळ विदेशी ब्रँडची दारू अर्पण करण्याची प्रथा आहे.

3. भैरव नाथ मंदिर (उत्तराखंड) भगवान भैरवाचे हे मंदिर केदारनाथ मंदिराजवळ स्थित आहे. धार्मिक दृष्टीने हे मंदिर फार महत्त्वाचे आहे. हिमवृष्टी काळात केदारनाथ मंदिर बंद असल्यास भैरव मंदिर मुख्य मानून येथे महादेवाची पूजा केली जाते. मान्यतेनुसार येथे स्थापित भैरवाला वैष्णो देवीचे वरदान प्राप्त आहे. यामुळे जो भक्त वैष्णवी देवीचे दर्शन करतो त्याला येथे येऊन भैरवाचे दर्शन घेणे अनिवार्य आहे. केदारनाथ भैरव दर्शनाशिवाय वैष्णो देवी यात्रा अपूर्ण मानली जाते.

4. खबीस बाबा मंदिर (उत्तरप्रदेश) उत्तरप्रदेशातील सीतापूरचे खबीस बाबा मंदिर देशातील अनोखा प्रसाद वाटले जाणारे मंदिर आहे. येथे लाखो भाविक नवस बोलण्यासाठी येतात. खबीस बाबा भैरवाचेच एक रूप मानले जातात. या मंदिरातही दारूचा नैवेद्य दाखवला जातो आणि प्रसाद स्वरूपात वाटला जातो.
X
COMMENT