या मंदिरांमध्ये शनिदेवाचे / या मंदिरांमध्ये शनिदेवाचे दर्शन केल्याने नष्ट होतात शनीदोष, प्रत्येकाचे खास महत्त्व

Nov 18,2017 05:00:00 AM IST

आज (18 नोव्हेंबर शनिवार) शनि अमावास्या आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला शनि देवाच्या अशा मंदिरांविषयी सांगणार आहेत, जेथे शनि देवाची आराधना केल्यास भक्तांचे सर्व दुःख दूर होतात.


1. शनि मंदिर, कोसीकला
दिल्लीपासुन 128 किमी अंतरावर कोसीकलां नावाच्या ठिकाणावर शनिदेवाचे मंदिर आहे. हे ठिकाण उत्तर प्रदेशच्या मथुरा या जिल्ह्यात आहे. याच्या आजुबाजूला नंदगांव, बरसाना आणि बांकेबिहारी मंदिर आहे. असे म्हटले जाते की, येथे परिक्रमा केल्याने मनुष्याच्या सर्व इच्छा पुर्ण होता. याविषयी लोकांचे मानने आहे की, येथे स्वतः कृष्णदेवाने शनिदेवाला दर्शन दिले होते. यावेळी कृष्णाने वरदान दिले होते की, जो मनुष्य पुर्ण श्रध्दने या वनाची परिक्रमा करेल त्यावर शनिदेवाची नेहमी कृपा राहिल.


कसे पोहोचावे
मथुरेपासुन कोसीकलां 21 किमी अंतरावर आहे. मथुरेपर्यंत रेल्वे मार्गाने येऊन एखाद्या वाहनाने कोसीकलांपर्यंत पोहोचता येते. कोसीकलांच्या 9- किमी अंदरावर खेरिया एयरपोर्ट आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर 5 मंदिरांविषयी सविस्तर माहिती...

2. शनि मंदिर, उज्जैन मध्य प्रदेशची धार्मिक राजधानी उज्जैनला मंदिरांचे नगर असेही म्हटले जाते. सांवेर रोडवरील प्राचीन शनि मंदिरसुध्या येथील प्रमुख दर्शनीय स्थळ आहे. या मंदिराची खास गोष्ट म्हणजे येथे शनिदेवासोबतच नवग्रहसुध्दा आहेत. यामुळे या मंदिराला नवग्रह मंदिर देखील म्हटले जाते. येथे लांबुन लाबून शनिभक्त आणि शनि प्रकोपाने प्रभावित लोक दर्शनासाठी येत असतात. या मंदिराजवळुनच शिप्रा नदी वाहते. जीला त्रिवेणी संगम म्हटले जाते. कसे पोहोचावे उज्जैन शहर देशाच्या सर्व रेल्वे मार्ग आणि रस्त्यांने जोडलेला आहे. येथे नियमत रेल्वे आणि बस येत राहतात. उज्जैनच्या 50 कि.मी अंतरावर इंदौरचे एयरपोर्ट आहे.3. शनि शिंगणापुर शनिदेवाच्या सर्वात खास मंदिरांपैकी एक मंदिर महाराष्ट्राच्या शिगंणापुर या गावात आहे. हे मंदिर महाराष्ट्राच्या अहमदनगर शहराच्या 35 की.मी अंतरावर आहे. या मंदिराची सर्वात खास गोष्ट म्हणजे येथे शनिदेवाची प्रतिमा मोकळ्या आभाळाखाली आहे. मंदिराला छत नाही. यासोबतच या घरातील कोणत्याच घराला कुलूप लावले जात नाही. मानले जाते की, येथील सर्व घरांची सुरक्षा स्वतः शनिदेव करतात. येथे शनिदेवाच्या दर्शनासाठी काही नियम आणि कायदे आहेत, त्यांचे पालन सर्वांना करावे लागते. येथे शनिदेवाचा अभिषेक ओल्या वस्त्रांमध्ये केला जाते. कसे पोहोचावे शनि शिंगणापुरला पोहोचण्यासाठी मुंबई, औरंगाबाद किंवा पुण्याला येऊन शिंगणापुरसाठी एक बस किंवा टॅक्सीने येता येते. येथे सर्वात जवळ औरंगाबाद एयरपोर्ट आहे. येथुन औरंगाबाद 90 कि.मी आहे.4. शनि मंदिर, इंदौर इंदौर, मध्येप्रदेशाच्या प्रमुख शहरांपैकी एक आहे. येथे शनिदेवाचे एक खास मंदिर आहे. हे मंदिर शनिदेवाच्या इतर मंदिरांपेक्षा वेगळे आहे. कारण येते शनिदेवाला 16 श्रृंगार केला आहे. इंदौरच्या जूनी इंदौर परिसरातील हे मंदिर आपली प्राचिनता आणि चमत्कारी गोष्टींसाठी प्रसिध्द आहे. शनिदेवाच्या सर्वच मंदिरा त्यांची प्रतिमा ही काळ्या दगडाने बनलेली असते आणि त्यावर कोणताच श्रृंगार नसतो, परंतु या मंदिरात शनिदेवाला रोज आकर्षक श्रृंगार केला जातो आणि शाही कपडे घालते जातात. या मंदिरात शनिदेव खुप सुंदर रुपात पाहायला मिळतात. कसे पोहोचावे इंदौर मध्य प्रदेशाच्या एका मुख्य शहरांपैकी एक आहे. येथे नियमित रेल्वे आणि बस येत असतात. येथे एयरपोर्ट देखील आहे. यामुळे हवाई मार्गानेही येथे पोहोचता येते.5. शनिश्वर मंदिर ग्वालियर मध्य प्रदेशच्या ग्लालियर शहरात हे मंदिर आहे. भारतातील प्राचिन शनि मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. मानले जाते की, हनुमानाने लंकेमधुन फेकलेले शनिपिंड येथे येऊन पडले होते. तेव्हा पासुन येथे शनिदेवाची स्थापना करण्यात आली. येथे शनिदेवाला तेल वाहिल्यानंतर गळाभेट घेण्याची प्रथा देखील आहे. जो मनुष्य येथे येतो तो प्रेमाने शनिदेवाची गळाभेट घेतो आणि आपले दुःख वाटतो. कसे पोहोचावे ग्वालियर, मध्य प्रदेशच्या प्रमुख शहरांपैकी एक आहे. येथुन नियमित रेल्वे आणि बस जात राहतात. ग्वालियरमध्ये एयरपोर्ट देखील आहे. हवाईमार्गाने देखील येथे पोहोचता येते.6. कष्टभंजन हनुमान मंदिर गुजरातच्या भावनगरच्या सारंगपुरमध्ये हनुमानाचे एक प्राचिन मंदिर आहे. याला कष्टभंजन हनुमानच्या नावाने ओळखले जाते. हे मंदिर खुप खास आहे कारण येथे हनुमानसोबतच शनिदेवही विराजित आहे. येवढेच नाही तर येथे शनिदेव स्त्री रुपात हनुमानाच्या चरणांमध्ये बसलेले दिसतात. या मंदिराविषयी म्हटले जाते की, कोणत्याही भक्ताच्या कुंडलीमध्ये शनि दोष असेल तर कष्टभंजन हनुमानाचे दर्शन आणि पूजा-अर्चना केल्याने सर्व दोष दूर होतात. याच कारणामुळे वर्षभर या मंदिरात भक्ताची गर्दी असते.
X