का बंद झाली ही गुहा, येथेच झाला होता का हनुमानाचा जन्म?
31 मार्च, शनिवारी हनुमान जयंती आहे. यानिमित्त आम्ही तुम्हाला हनुमानाशी संबंधित एका खास ठिकाणाविषयी माहिती देणार आहोत.
-
यूटिलिटी डेस्क- 31 मार्च, शनिवारी हनुमान जयंती आहे. यानिमित्त आम्ही तुम्हाला हनुमानाशी संबंधित एका खास ठिकाणाविषयी माहिती देणार आहोत. याच ठिकाणी हनुमानाचा जन्म झाला, अशी लोकमान्यता आहे. झारखंडमधील गुमला या जिल्ह्यात आंजन या गावी हे ठिकाण आहे. येथे एक गुहा आहे. ही गुहाच हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचे म्हटले जाते. कलियुगात ही गुहा हनुमानाची आई अंजनीच्या क्रोधामुळे बंद झाली, अशी मान्यता आहे.
देवी अंजनीच्या नावावरून या गावाचे नाव ठेवण्यात आले आहे आंजन
हनुमानाची आई अंजतीच्या नावावरून या गावाचे नाव आंजन ठेवण्यात आले आहे. गुमला जिल्ह्यापासून जवळपास 22 किमी अंतरावर हे गाव आहे. येथे एकमेव असे मंदिर आहे, जेथे हनुमान आपल्या आईच्या मांडीवर बसलेले दिसतात.पुढील स्लाइडवर वाचा, यामुळे कलियुगात बंद झाले या गुहेचे दरवाजे...
-
यामुळे कलियुगात बंद झाले या गुहेचे दरवाजे
स्थानिक मान्यतानूसार, गुमला जिल्ह्यातील आंजनधाम येथील एका डोंगरावरील गुहेमध्ये हनुमानचा जन्म झाला. या गुहेचा दरवाजा कलियुगात आपोआप बंद झाला. असे म्हटले जाते की, येथील लोकांनी याठिकाणी एक बळी दिल्यामुळे नाराज झालेल्या हनुमानच्या आई अंजनी यांनी हा दरवाजा बंद केला. आंजन धाममध्ये आजही गुहा तुम्ही पाहू शकता. -
1953मध्ये बनवले गेले अंजनी आणि हनुमानाचे मंदिर
आंजनधामध्ये एक छोटेसे मंदिर आहे. 1953मध्ये हनुमान भक्तांनी याची स्थापना केली होती. या मंदिरात हनुमान आणि माता अंजनीची एक सुंदर मुर्ती आहे. येथे हनुमान आपल्या आईच्या मांडिवर बसलेले दिसतात. -
येथील एका तलावात राम-लक्ष्मणने केले होते स्नान
आंजन क्षेत्राशी अनेक पौराणिक गाथा जुडलेल्या आहेत. या क्षेत्रामध्येच पंपापुर नावाचे एक सरोवर आहे. याच सरोवरामध्ये राम आणि लक्ष्मणाने स्नान केले होते, अशी मान्यता आहे.