Home | Jeevan Mantra | Teerath Darshan | 6 Indian Temples With Magic Flame

6 अनोखे मंदिर : जेथे हजारो वर्षांपासून आपोआप जळत आहे अग्नी

यूटिलिटी डेस्क | Update - Feb 20, 2018, 12:36 PM IST

मंदिर छोटे असो किंवा मोठे प्रत्येक मंदिराबद्दल लोकांच्या मनात श्रद्धा आणि भक्तीचा भाव असतो.

 • 6 Indian Temples With Magic Flame

  मंदिर छोटे असो किंवा मोठे प्रत्येक मंदिराबद्दल लोकांच्या मनात श्रद्धा आणि भक्तीचा भाव असतो. परंतु काही मंदिरांच्या चमत्कारिक गोष्टी ऐकून भक्त लांबून-लांबून दर्शनसाठी येतात. मंदिरांमधील दिव्याचेसुद्धा खूप महत्त्व आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही मंदिरांची माहिती देत आहोत, ज्यामधील अग्नी वर्षानुवर्षापासून जळत आहे. या दिव्य अग्नीचे दर्शन करून भक्त स्वतःला धन्य मानतात.

  ममलेश्वर महादेव
  हिमाचल प्रदेशातील ममलेश्वर महादेव मंदिरात स्थित असलेल्या या धुनीला अग्नू कुंड असेही म्हटले जाते. या मंदिरात पाच शिवलिंग असून, हे पांडवानी स्थापित केलेले आहेत. पाच हजार वर्षांपूर्वी पांडव येथे आले होते आणि त्यावेळी त्यांनी येथे एक अग्नी कुंड प्रज्वलित केले होते. तेव्हापासून या अग्निकुंडात निरंतर अग्नी जळत आहे. म्हणजेच पांडवानी प्रज्वलित केलेला हा अग्नी आजही पाहिला जाऊ शकतो.


  पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणकोणत्या मंदिरातील ज्योती प्राचीन काळापासून प्रज्वलित आहेत...

 • 6 Indian Temples With Magic Flame

  उत्तराखंड येथील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील त्रियुगी नारायण गावात एक मंदिर असून याला त्रियुगी नारायण मंदिर नावाने ओळखले जाते. या मंदिरात एक अग्निकुंड असून हे भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या लग्नासाठी प्रज्वलित केलेले अग्नीकुंड मानले जाते. मान्यतेनुसार हे कुंड सतयुगापासून प्रज्वलित आहे यामुळे हे त्रियुगी अग्निकुंड नावानेसुद्धा प्रसिद्ध आहे. या कुंडातील अग्नी अखंड ठेवण्यासाठी यामध्ये नेहमी लाकडे टाकली जातात. प्राचीन काळात हवन आणि यज्ञ करण्यासाठी लोक या कुंडातून अग्नी घेऊन जात होते. आजही भक्त या कुंडाचे दर्शन घेतात आणि यामधील राख कपाळावर लावतात.

 • 6 Indian Temples With Magic Flame

  वृंदावनच्या श्री राधारमण मंदिरात प्रज्वलित असलेल्या या अखंड ज्योतीचे दर्शन घ्या. स्थानिक मान्यतेनुसार, ही ज्योती  तामिळनाडूतील श्रीरंगपट्टनम स्‍थ‌ित श्रीरंगम् मंदिरातून वृंदावन येथे आली आहे. चैतन्य महाप्रभूचे भक्त श्री गोपाल भट्ट यांनी 500 वर्षांपूर्वी ही ज्योत येथे आणली. तेव्हापासून ही ज्योत कधीही विझली नाही. मंदिरातील दिवे याच ज्योतीच्या अग्नीने लावले जातात.

 • 6 Indian Temples With Magic Flame

  आसाममध्ये स्थित तंत्रपीठ कामाख्या मंदिरातसुद्धा एक दिव्य ज्योती प्रज्वलित असून ही नैसर्गिक मानली जाते. मंदिराच्या आत आंधरामध्ये तुम्हाला एक मंद ज्योती जळताना दिसेल. या ज्योतीचे दर्शन घेऊन लोक स्वतःला धन्य मानतात.

 • 6 Indian Temples With Magic Flame

  मध्यप्रदेशातील उज्जैन येथे स्थित हे आहे हरसिद्धी देवी मंदिर. या मंदिरात 30 अखंड दीप प्रज्वलित आहेत. हे दिवे 2000 वर्षांपासून प्रज्वलित असल्याने सांगितले जाते. मान्यतेनुसार महाराजा विक्रमादित्यचा भाचा विजयसिंह देवी हरसिद्धीचा भक्त होता. देवीनी स्वप्नामध्ये दर्शन देऊन यांना मंदिर बांधण्यास सांगितले. त्यावेळी देवीने सांगितले की, तू मंदिराचे मुख पूर्व दिशेला ठेव, मंदिरात माझा प्रवेश होताच हे पश्चिम दिशेला होईल आणि हाच माझा मंदिर प्रवेशाचा संकेत असेल. त्यानंतर देवीने मंदिरात दिवे लावण्यास सांगितले. त्यावर राजा विजयसिंह म्हणाले की, दिवे काही काळाने विझून जातील. देवीने सांगितले की, हे दिवे अखंड असतील आणि हवासुद्धा यांना विझवू शकणार नाही. दररोज या दिव्यांमध्ये तेल भरले जाते आणि हे निरंतर जळत राहतात.

 • 6 Indian Temples With Magic Flame

  ज्वालादेवी शक्तीपीठ हिमाचल प्रदेशातील कांगडा घाटीतील प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरात जमिनीच्या आतून ज्वाला निघताना दिसतात आणि ही ज्वाला देवीचे साक्षात रूप मानली जाते. मुघल बादशाह अकबरने ही ज्वाला विझवण्याचा पर्यंत केला होता, परंतु त्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. शेवटी देवीची शक्ती मान्य करून अकबराने देवीला सोन्याचे छत्र अर्पण केले. मान्यतेनुसार हा अग्नी देवीने बाबा गोरखनाथ यांचे जेवण कारणासाठी प्रज्वलित केला होता. परंतु धान्य आणण्यासाठी गेलेले गोरखनाथ परत आले नाहीत, यामुळे आजही अग्नी प्रज्वलित करून गोरखनाथ यांची वाट पाहत देवी येथे विराजमान आहे.

Trending