दर्शनासाठी खुले झाले / दर्शनासाठी खुले झाले केदारनाथ मंदिर, प्रथमच लेझर शोद्वारे दिसणार शिव इतिहास

रिलिजन डेस्क

May 01,2018 02:40:00 PM IST

हर हर महादेवच्या जयघाेषात अाणि मंत्राेच्चारात बारा ज्योतिर्लिंगांपैकी प्रमुख ज्योतिर्लिंग आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या केदारनाथ मंदिराचे कपाट (रविवार, 29 एप्रिल) उघडण्यात अाले. त्यानंतर दिवसभर दर्शनासाठी भाविकांची विक्रमी गर्दी हाेती. यंदा प्रथमच मंदिरावर लेझर शाेद्वारे शिवमहिम्याचे दर्शन भाविकांना घडवून देण्यात अाले.


केदारनाथ मंदिराच्या कपाट पूजनासाठी उत्तराखंडचे राज्यपाल के. के. पाैल, मंदिराचे प्रमुख पुजारी भीमाशंकर रावल, गंगाधर लिंगा, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी बी. डी. सिंग, नाशिकच्या कैलास मठाचे स्वामी संविदानंद महाराज अादी उपस्थित हाेते. वैदिक मंत्राेच्चारात मंदिराचे कपाट खुले करण्यात अाले. या निमित्ताने यमुनाेत्री, गंगाेत्री, केदारनाथ अाणि बद्रीनाथ या चार धामांची यात्रा सुरू झाली. केदारनाथला भाविक यंदापासून लेझर शाेचा अास्वाद घेत अाहेत.


शनिवारपर्यंत पाहता येणार लेझर शाे
- शनिवार (दि. 28 एप्रिल) पासून हा लेझर शाे सुरू करण्यात अाला असून पुढील शनिवार (दि. 5 मे)पर्यंत ताे भाविकांना बघता येईल.
- भगवान शंकराच्या वेगवेगळ्या मुद्रा लेझरच्या माध्यमातून मंदिरावर साेडण्यात येतात
- या शाेमध्ये बाबा केदारनाथच्या स्थापनेपासून प्रसिद्ध धार्मिक स्थानांवर अालेली अापत्ती अाणि त्यानंतरची स्थिती दाखवली जातेय
- शाेच्या माध्यमातून रात्रीच्या वेळी शिवमहिम्याचा अाविष्कार बघायला मिळत अाहे.


पुढील स्लाईड्सवर पाहा, लेझर शोचे काही खास फोटो...

X
COMMENT