आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या ठिकाणी अजूनही आहे परशुरामांचे 'परशु अस्त्र', आजपर्यंत लागला नाही गंज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू पंचागनुसार, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्ष तृतीया तिथीला भगवान परशुरामाची जयंती साजरी केली जाते. यावेळी 18 एप्रिल, बुधवारी परशुराम जयंती आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला परशुराम यांच्या झारखंड येथे असलेल्या परशु अस्त्राची माहिती देत आहोत. झारखंड राज्यातील रांचीपासून 150 किलोमीटरवर गुमला जिल्ह्यात एका पर्वतावर टांगीनाथ धाम असून येथे परशुराम यांचे परशु अस्त्र असल्याचा दावा स्थानिक लोक करतात. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, एका लोहाराने परशुरामाचे हे अस्त्र चोरी करण्याचा प्रयत्न केला परंतु थोड्याच दिवसानंतर त्याचा मृत्यू झाला.


आजपर्यंत लागला नाही गंज
- या ठिकाणी उघड्यावर असलेल्या परशुला आजपर्यंत गंज लागलेला नाही.
- या अस्त्राला गंज लागत नाही हे समजल्यानंतर या भागात राहणाऱ्या लोहार समुदायातील काही लोकांनी परशु घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता.
- जमिनीतून परशु काढण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्यामुळे यांनी परशूचा वरील भाग कापला परंतु तो भागही ते लोक घेऊन जाऊ शकले नाहीत.
- स्थानिक लोकांनी हा घटनेचे महत्त्व लक्षात घेऊन त्या ठिकाणीच कापलेला परशु स्थापित केला.
- या परशु अस्त्राला तोडण्याची शिक्षा येथील लोहार समुदायातील लोकांना भोगावी लागत आहे.
- अनेक पिढ्या होऊन गेल्या तरी या समुदायातील व्यक्ती टांगीनाथ धाम आणि जवळपाच्या गावात राहू शकत नाही.
- असे सांगितले जाते की, त्या घटनेनंतर या भागात राहणाऱ्या लोहार समुदायाच्या लोकांचा एक-एक करून मृत्यू होऊ लागला.
- भीतीमुळे या लोकांनी हा भाग सोडला आणि आताही येथे येण्याचा विचारसुद्धा करत नाहीत.


स्वतः भगवान परशुराम यांनी जमिनीत पुरले होते परशु अस्त्र
- दंतकथेनुसार, स्वतः भगवान परशुराम यांनी या ठिकाणी जमिनीत परशु अस्त्र पुरले होते.
- पौराणिक कथेनुसार लाखो वर्षांपूर्वी भगवान परशुराम यांचा टांगीनाथ धामाशी काय संबंध असू शकतो, हा संशोधनाचा विषय आहे परंतु येथे त्यांच्या आगमनाची एक रोचक कथा सांगितली जाते.
- त्रेतायुगात जनकपूर येथे स्वयंवरामध्ये महादेवाचे धनुष्य तोंडल्यानंतर श्रीराम आणि देवी सीतेचे लग्न झाले. त्यानंतर श्रीराम, लक्ष्मण, देवी सीता आयोध्येकडे निघाले.
- रस्त्यामध्ये भगवान विष्णूचाच एक अवतार मानले जाणारे परशुराम यांनी त्यांना अडवले. श्रीरामांनी महादेवाचे धनुष्य तोडल्यामुळे ते क्रोधीत होते कारण महादेव परशुराम यांचे गुरु होते.
- परशुराम हे श्रीरामाला खूप बोलले परंतु श्रीराम मौन राहिले. हे पाहून लक्ष्मणाला खूप राग आला. त्यांनी परशुरामासोबत खूप वाद घातला आणि यादरम्यान परशुरामांना समजले की, श्रीरामही त्यांच्याप्रमाणेच विष्णू अवतार आहेत.
- त्यानंतर परशुरामांनी याचे प्रायश्चित करण्यासाठी एका घनदाट जंगलात पर्वतावर गेले. त्याठिकाणी त्यांनी परशु अस्त्र पुरले आणि बाजूला बसून तप केले.
- गुमला येथील लोक पिढ्यांपासून ही दंतकथा ऐकत आले आहेत की, परशुराम यांनी ज्या ठिकाणी तपश्चय केली ते ठिकाण टांगीनाथ धामच आहे. या ठिकाणी परशुराम यांचे पदचिन्ह आहे.


पुढील स्लाईड्सवर पाहा, भगवान परशुराम यांचे परशु अस्त्र आणि टांगीनाथ धामचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...