आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्याकुमारी : येथे होते दोन समुद्रांचे मिलन, 5 ठिकाण शहराला बनवतात बेस्ट डेस्टिनेशन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर तुम्ही तीर्थ यात्रेसोबतच समुद्राच्या जवळपास असलेल्या नैसर्गिक वातावरणाचा आनंद घेण्यास इच्छुक असाल तर तुमच्यासाठी कन्याकुमारी बेस्ट डेस्टिनेशन आहे. तामिळनाडू राज्याच्या दक्षिण तटावर कन्याकुमारी शहर स्थित आहे. कन्याकुमारी येथे तुम्ही हिंद महासागर, बंगालची खाडी आणि अरबी समुद्राचा अनोखा संगम पाहू शकता. येथे 2 समुद्रांचे मिलन दिसून येते. येथे जाणून घ्या, कन्याकुमारीचे खास ठिकाण कोणकोणते आहेत...


पहिले ठिकाण आहे कन्याकुमारी मंदिर
हे मंदिर पर्यटकांसाठी अत्यंत खास आहे. येथे देवी-देवतांच्या दर्शनासोबतच समुद्राचा विशाल तट पाहण्यास मिळतो. हे मंदिर समुद्र तटावर असल्यामुळे समुद्राच्या लाटा या मंदिरापर्यंत येतात. हे दृश्य अत्यंत मनमोहक दिसते.


दुसरे ठिकाण आहे विवेकानंद स्मारक
कन्याकुमारीच्या समुद्राच्या मधोमध एका मोठ्या खडकावर विवेकानंद स्मारक आहे. या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनी तपश्चर्या केली होती असे मानले जाते. 


तिसरे ठिकाण आहे विवेकानंद रॉक मेमोरियल
विवेकानंद रॉक मेमोरियल समुद्रामध्ये असलेल्या दुसऱ्या मोठ्या खडकावर आहे. येथील मान्यतेनुसार, विवेकानंद कन्याकुमारीला आल्यानंतर येथे बसत होते. या ठिकाणीच त्यांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली होती.


चौथे ठिकाण आहे गुगनंत स्वामी मंदिर
मान्यतेनुसार येथील गनंत स्वामी मंदिर 100 वर्ष जुने आहे. हे चोल राजाने बांधले होते. हे मंदिरही येथील पर्यटन स्थळांमधील एक आहे.


पाचवे ठिकाण आहे गांधी स्मारक 
कन्याकुमारी मंदिराजवळच गांधी स्मारक स्थित आहे. महात्मा गांधी यांचा अस्थिकलश या ठिकाणी ठेवण्यात आला आहे. गांधी स्मारकात तुम्ही गांधीजींच्या जीवनाशी संबंधित काही वस्तूही पाहू शकता.


हेसुद्धा आहेत खास ठिकाण 
कन्याकुमारी येथे कवी तिरुवल्लुवर यांची विशाल मूर्ती, उदयगिरी किल्ला, नागरकोईल, सुचिंद्रम इ. ठिकाण पाहू शकता.


पुढील स्लाईड्सवर पाहा, या ठिकाणांचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...