आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात श्रीमं‍त मंदिराचा हा दरवाजा रहस्‍यमयी, कलियुगाच्‍या पहिल्‍या दिवशी झाली स्‍थापना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केरळच्‍या तिरुअंनतपूरमध्‍ये भगवान विष्‍णुचे प्रसिद्ध पद्मनाथस्‍वामी मंदिर आहे. देशरातील वैष्‍णव मंदिरामधील हे एक विशेष आणि केरळमधील खास पर्यटनस्‍थळ आहे. मंदिरात पद्मनाथ स्‍वामींच्‍या मुर्तीची स्‍थापना कोणी आणि केव्‍हा केली, याची निश्चित अशी माहिती उपलब्‍ध नाही. मात्र कलियुगाच्‍या पहिल्‍या दिवशी, 5000 वर्षांपूर्वी या मंदिराची स्‍थापना झाली, अशी मान्‍यता आहे. या मंदिराच्‍या गर्भ गृहात खजिना मिळाला होता, यामुळे हे मंदिर भारतातील सर्वात श्रींमत मंदिरांपैकी एक आहे. येथे जाणुन घ्‍या पद्मानथ मंदिराच्‍या खास गोष्‍टी...

 

मंदिरातील आणखी एक तळघर उघडण्‍याचे बाकी आहे
- पद्मनाथ मंदिरातील एक तळघर अद्यापही उघडण्‍यात आलेले नाही. यामुळे याच्‍यामध्‍ये काय आहे, याबाबत अजुनही रहस्‍य आहे. तिरुअनंतपुरम नगरचे नाव भगवानाच्‍या 'अनंत' नावाच्‍या नागावरुन नागावरुन ठेवण्‍यात आले आहे.
- मंदिराच्‍या बंद तळघराच्‍या सातव्‍या दरवाजावर नागाचे चिन्‍ह आहे.
- हा दरवाजा केवळ काही मंत्रांनीच उघडता येतो, अशी मान्‍यता आहे.
- बलपूर्वक या दरवाज्‍याला उघडण्‍याचा प्रयत्‍न केल्‍यास, काही अघटीत घडेल, या कारणामुळे अद्यापही या दरवाजाला उघडण्‍यात आलेले नाही.


वेळोवेळी केला जातो मंदिराचा जीर्णोद्धार
वेळोवेळी या मंदिराचा जीर्णोद्धार केला जातो. मान्‍यता आहे की, जवळपास 1733 वर्षांपूर्वी त्रावनकोर महाराजा मार्तंड वर्मांनी या मंदिराचे पुनर्निर्माण केले होते. म्‍हटले जाते की, सर्वात प्रथम याच स्‍थानावरुन भगवान विष्‍णुची मुर्ती मिळाली होती. त्‍यानंतर येथे मंदिराची स्‍थापना केली गेली.

 

येथे आहे भगवान विष्‍णुची विशाल प्रतिमा
या मंदिरात भगवान विष्‍णुची विशाल मुर्ती आहे. यामध्‍ये भगवान श्रीहरि शेषनागावर शयन मुद्रेमध्‍ये आपल्‍याला दर्शन देतात.

 

नागाच्‍या नावावरुन ठेवण्‍यात आले आहे तिरुअनंतपुरमचे नाव
देवाच्‍या 'अनंत' या नागावरुनच तिरुअनंतपुरमचे नाव ठेवण्‍यात आले आहे. येथे भगवान विष्‍णुच्‍या विश्राम अवस्‍थेला 'पद्मनाथ' म्‍हटले जाते. येथील नैसर्गिक वातावरण फार सुंदर आहे.


मंदिराची बनावट शैली आहे विशेष
हे मंदिर गोपुरम द्रविड शैलीत बनलेले आहे. यामुळे हे मंदिर अतिशय आकर्षक आहे. पद्मनाथ मंदिर दक्षिण वास्‍तुकलेचे अद्भूत उदाहरण आहे. हे मंदिर परिसर सात मजल्‍याएवढे विशाल आहे. मंदिराजवळ तलावही आहे, याला 'पद्मतीर्थ कुलम' म्‍हटले जाते.


येथे राहण्‍यासाठीही आहे चांगली सुविधा
जगभरात हे मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे. यामुळे येथे विदेशी पर्यटकही भरपूर प्रमाणात येतात. पर्यटकांसाठी येथे हॉटेल्‍सची सुविधा आणि धर्मशाळा सहजतेने मिळतात. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो...

बातम्या आणखी आहेत...