Home | Jeevan Mantra | Teerath Darshan | Interesting Facts Of Kamakhya Temple

या देवी मंदिरात प्रसाद स्वरूपात भक्तांना दिला जातो ओला कपडा

यूटिलिटी डेस्क | Update - Mar 19, 2018, 03:17 PM IST

सध्या चैत्र नवरात्रीचा उत्सव संपूर्ण भारतात साजरा केला जात आहे. यामुळेच प्रमुख देवी मंदिरात भक्तांची गर्दी होत आहे.

 • Interesting Facts Of Kamakhya Temple

  सध्या चैत्र नवरात्रीचा उत्सव संपूर्ण भारतात साजरा केला जात आहे. यामुळेच प्रमुख देवी मंदिरात भक्तांची गर्दी होत आहे. आसाममधील गुवाहाटी येथे स्थित कामाख्या शक्तीपीठवर लोकांची विशेष श्रद्धा आहे. ग्रंथानुसार देवी सतीसाठी असलेला महादेवाचा मोह भंग करण्यासाठी भगवान विष्णू यांनी आपल्या सुदर्शन चक्राने देवी सतीच्या मृत शरीराचे 51 भाग केले होते. ज्या-ज्या ठिकाणी देवी सतीच्या शरीराचे अवयव पडले, ते शक्तीपीठ रुपात प्रसिद्ध झाले.


  असे सांगितले जाते की, देवी सतीचा योनी भाग ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणाला कामाख्या महापीठ म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार येथे देवीचा योनी भाग असल्यामुळे येथे देवी रजस्वला होते. कामाख्या शक्तीपीठ चमत्कार आणि रोचक गोष्टींनी भरलेले आहे. आज आम्ही तुम्हाला कामाख्या शक्तीपीठाशी संबंधित 6 रोचक तथ्य सांगत आहोत.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या मंदिराविषयी इतर काही खास गोष्टी...

 • Interesting Facts Of Kamakhya Temple

  येथे देवी प्रत्येक वर्षी होते रजस्वला
  या शक्तीपीठाविषयी एक अत्यंत रोचक कथा प्रसिद्ध आहे. कथेनुसार या ठिकाणी देवीचा योनी भाग पडला होता. यामुळे देवी येथे प्रत्येक वर्षी तीन दिवसांसाठी रजस्वला होते. या काळात मंदिर बंद असते. तीन दिवसांनतर मंदिर पुन्हा उघडले जाते.

 • Interesting Facts Of Kamakhya Temple

  प्रसाद रुपात भक्तांना दिला जातो ओला कपडा
  येथे प्रसाद रुपात भक्तांना ओला कपडा दिला जातो. या वस्त्राला अम्बुवाची वस्त्र म्हणतात. देवी रजस्वला असताना मूर्तीच्या जवळपास पांढरा कपडा अंथरला जातो. तीन दिवसांनी मंदिर उघडल्यानंतर पांढरा कपडा देवीच्या रजने लाल रंगाने भिजलेला असतो. त्यानंतर हे वस्त्र प्रसाद स्वरुपात भक्तांना वाटले जाते.

 • Interesting Facts Of Kamakhya Temple

  मंदिरात नाही देवीची मूर्ती
  या मंदिरात देवीची कोणतीही मूर्ती नाही. येथे देवीच्या योनी भागाचीच पूजा केली जाते. मंदिरातील एक कुंड नेहमी फुलांनी झाकून ठेवलेले असते. येथून जवळच एका ठिकाणी देवीची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. हे पीठ देवीच्या इतर सर्व पीठामध्ये महापीठ मानले जाते.

 • Interesting Facts Of Kamakhya Temple

  लुप्त झाले आहे मूळ मंदिर
  प्राचीन कथेनुसार, या ठिकाणी एक नरक नावाचा राक्षस होता. या राक्षसाने देवीसमोर लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. देवी नरकसोबत लग्न करण्यास तयार नव्हती, यामुळे त्यांनी त्या राक्षसासमोर एक अट ठेवली. अटीनुसार नरकाने एका रात्रीतून या ठिकाणी मार्ग, घाट, मंदिर हे सर्वकाही निर्माण केले तर देवी त्याच्यासोबत लग्न करेल. ही अट पूर्ण करण्यासाठी नरकाने विश्वकर्मा यांना बोलावून काम सुरु केले. काम पूर्ण होताना पाहून देवीने रात्र संपण्यापूर्वीच कोंबड्याद्वारे सकाळ झाल्याचे भासवले आणि यामुळे लग्न होऊ शकले नाही. आजही पर्वतावर जाण्याच्या मार्गाला नरकासुर मार्ग नावाने ओळखले जाते. ज्या मंदिरात देवीची मूर्ती स्थापित आहे, त्या मंदिराला कामादेव मंदिर म्हणतात.


  या मंदिरासंदर्भात सांगितले जाते की, नरकासुरच्या अत्याचारांमुळे कामाख्या देवीच्या दर्शनात अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या होत्या. यामुळे क्रोधीत झालेल्या महर्षी वशिष्ठ यांनी या जागेला शाप दिला. असे सांगितले जाते की, शापाच्या प्रभावाने काळाच्या ओघात कामाख्या पीठ लुप्त झाले आहे.

 • Interesting Facts Of Kamakhya Temple

  भैरव दर्शनाशिवाय अपूर्ण आहे कामाख्या यात्रा
  कामाख्या मंदिराजवळ उमानंद भैरवाचे मंदिर आहे. उमानंद भैरव या शक्तीपीठाचे भैरव आहे. हे मंदिर ब्रह्मपुत्र नदीच्या मध्ये आहे. असे सांगितले जाते की, यांचे दर्शन घेतल्याशिवाय कामाख्या देवीची यात्रा पूर्ण होत नाही.

 • Interesting Facts Of Kamakhya Temple

Trending