'श्रीदेवी' च्या पूजेसाठी / 'श्रीदेवी' च्या पूजेसाठी येथे पुरुष बनतात स्त्री, सर्व धर्माचे लोक होतात सहभागी

रिलिजन डेस्क

Jul 29,2018 12:01:00 AM IST

केरळमध्ये तिरुवनंतपूरमपासून 82 किलोमीटर अंतरावर कोटकुलनारा नावाचे एक छोटेसे गाव आहे. येथे 'श्रीदेवी' नावाचे एक मंदिर आहे. प्रत्येक वर्षी येथे एक वेगळ्या प्रकारचा 'देवी दरबार' भरतो, ज्याला चमयविलक्कू महोत्सव म्हणतात. वर्षातील दोन दिवस जवळपास गावातील आणि दूरवरून हजारो पुरुष साड्या, लहेंगे परिधान करून येथे येतात. चेहऱ्यावर भरपूर मेकअप असतो, हातामध्ये बांगड्या घातलेल्या असतात. डोक्यावर विगमध्ये गजरा, मेहंदी, लिपस्टिक, काजल लावून पुरुष स्त्रीप्रमाणे सजतात.


हे सर्व पुरुष ट्रान्सजेंडर नसतात. फक्त या मोहित्सवासाठी या स्वरूपात तयार होतात. अनेक लोक अशाच गेटअपमध्ये आपल्या पत्नी-मुलांसोबत येथे येतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला ‘चमयविल्लुक’ म्हणजे दिवे लावले जातात. ओळखीच्या लोकांच्या गाठीभेटी घेतात. अनोळखी लोकांशी मैत्री करतात. रस्त्यावर रथयात्रा आणि दिखावे काढले जातात. साडी आणि मेकअपने सजलेले पुरुष देवीची पूजा करतात. इच्छापूर्तीसाठी नवस बोलतात. इच्छा पूर्ण झाल्यानंतर नवस फेडण्यासाठी पुरुष स्त्री रूपात येथे येतात.


दगडातून 'रक्त' निघाले आणि पुजाऱ्याने येथेच मंदिर बनवण्यास सांगितले
या प्रथेची सुरुवात केव्हा आणि कशी झाली, याविषयी कोणतेही ठोस लिखित पुरावे नाहीत. परंतु एक कथा अनेक वर्षांपासून सांगण्यात येते. काही काळापूर्वी कोटकुलनारा गावात लहान मुले नारळाने कॅच-कॅच खेळत होते. अचानक नारळ एका दगडावर पडले आणि फुटले. नारळातून रक्तासारखा द्रवपदार्थ बाहेर पडला. येथून एक पुजारी चालला होता. पुजाऱ्याला त्या दगडामध्ये देवाचे स्वरूप आणि चमत्कारिक शक्ती दिसली. पुजाऱ्याने मुलांना तेथेच तो दगड स्थापित करूनदगडाला देवी मानून पूजा करण्यास सांगितले. परंतु त्यावेळी तेथील प्रथेनुसार देवीची पूजा फक्त महिलांचा करू शकतात आणि तेथून दूर-दूरपर्यंत एकही महिला नव्हती. यामुळे पुजाऱ्याने त्या मुलांनाच मुलगी बनून देवीची पूजा करण्यात सांगितले. तेव्हापासून मुलांना मुलगी बनवून श्रीदेवी'ची पूजा करण्याची प्रथा सुरु झाली.


मुस्लिम आणि ख्रिश्चन पुरुषही येथे स्त्री बनून येतात...
स्थानिक लोकांच्या मते ही पूजा धर्माचाही वर आहे. यामागचा हेतू म्हणजे, समाजातील सर्व धर्माच्या लोकांनी मिळून-मिसळून हा उत्सव साजरा करावा. धार्मिक आणि सामाजिक स्तवरावर केरळ आजही खूप स्ट्रिक्ट आहे. सर्व प्रथा-परंपरा काटेकोरपणे पाळल्या जातात. अशा परिस्थितीमध्ये ही देवी पूजा एकमेकांशी मोकळ्यामनाने भेटण्याचा मार्ग आहे. काही उत्सव अनेक दिवस चालतात परंतु हा उत्सव केवळ दोन दिवस चालतो. या उत्सवासाठी लोक राखीव वेळ काढून येतात.


पुढील स्लाईड्सवर पाहा, फोटो...

X
COMMENT