आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाशिवरात्री : माहिती आहेत का महाराष्ट्रातील या 5 ज्योतिर्लिंगाच्या खास गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला खूप पवित्र मानले जाते. महादेवाच्या विशेष उपासनेसाठी महाशिवरात्रीची ख्याती आहे. जीवनातील दुःख, अडचणी, पाप, आर्थिक समस्या दूर करण्यासाठी आजच्या दिवशी महादेवाची भक्तिभावाने उपासना केली जाते. प्राचीन काळापासून ऋषी-मुनींनी, देवतांनी, असुरांनी देवांचे देव महादेवाची तपश्चर्या करुन वरदान प्राप्त केले आहेत.


भारतामध्ये 12 प्रमुख ज्योतिर्लिंग असून यामधील पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. या सर्वांचे विशेष असे एक महत्त्व आहे. महाशिवरात्री (मंगळवार, 13 फेब्रुवारी)च्या निमित्ताने आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील पाचही ज्योतिर्लिंगाची माहिती देत आहोत.


घृष्णेश्वर
घृष्णेश्वर दर्शनासाठी सर्व पुरुषांसाठी एक खास नियम आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी पुरुषांनी चामड्यापासून बनलेल्या सर्व वस्तू उदा. बेल्ट, पॉकेट मंदिराबाहेरच काढून ठेवणे आवश्यक आहे. पुरुषांनी कंबरेच्या वर घातलेले शर्ट, जॅकेट काढून ठेवावे लागते. या नियमाचे पालन केले तरच गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो. 


भीमाशंकर
भीमाशंकर हे बारा ज्योतीर्लिंगापैकी एक आहे. भीमा नदीचे उगमस्थान असलेले हे क्षेत्र समुद्रसपाटीपासून 3500 फूट उंचीवर घनदाट जंगलाने वेढलेले आहे. भीमाशंकर मंदिर 1200 वर्षापूर्वीचे असून हे हेमाडपंथी बांधणीचे आहे. मंदिराच्या छतावर आणि खांबावर अतिशय सुंदर नक्षीकाम दिसून येते. मंदिर परिसरात शनि मंदिरही आहे. या क्षेत्राचा पुराणातही उल्लेख सापडतो. भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची संपूर्ण माहिती आणि पौराणिक कथा वाचण्यासाठी येथे क्लिक करा...


औंढा नागनाथ
हिंगोली जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग मंदिरातील लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे महादेवाच्या पिंडीसमोर नंदीची मूर्ती नाही. नंदिकेश्वराचे स्वतंत्र मंदिर बाजूला आहे. मंदिराच्या आवारात 12 ज्योतिर्लिंगाची छोटी-छोटी मंदिरे आहेत. 


परळीचे वैजनाथ
देशभरातील बारा ज्योतीर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग म्हणुन परळीचे वैजनाथ प्रसिद्ध आहे. परळीच्या वैजनाथला दक्षिण काशी म्हणुनही संबोधले जाते. हे मंदिर मुळत: यादवकालीन असून मंदिराच्या जुन्या घाटात शके 1108 अशी नोंद आहे. मंदिराचे बांधकाम हेमाडपंती असून मंदिराचा जिर्णोध्दार इंदोरच्या राणी आहिल्याबाई होळकर यांनी केला. 


त्र्यंबकेश्वर
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगास ब्रम्हा, विष्णू, महेश या तिघांच्याही प्रतिमा आहेत. ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात त्र्यंबकेश्वर मंदिर वसले आहे. 


पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, या पाचही ज्योतिर्लिंगांची कथा....

बातम्या आणखी आहेत...