आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराझांसी (यूपी)- शहरापासून 14 किमी दूर दतिया जिल्ह्यातील उनाव बालाजी मंदिराप्रती येथील भक्तांमध्ये विशेष आस्था आहे. मागील 400 वर्षांपासून या मंदिरामध्ये अखंड ज्योती जळत आहे. फेस्टीव्हलमध्ये देवाला अर्पण करता यावे म्हणून तूप साठवण्यासाठी येथे 9 विहिरी खोदण्यात आल्या आहेत. भक्तांमध्ये मान्यता आहे की, मकर संक्रांतीला या मंदिरात आल्याने अनेक आजार दूर होतात. ज्या दाम्पत्यांना पूत्र होत नाही, त्यांनी सूर्याची पहिली किरण मंदिरातील गर्भगृहातील देवाच्या मूर्तीवर पडताच त्याचे दर्शन घेतले तर त्यांना पुत्र प्राप्ती होती.
कुंडात स्नान केल्याने असाध्य रोग होतात ठीक
- या मंदिराजवळून पहूज नदी जाते. या नदीमध्येच एक कुंड आहे. यात स्नान केल्याने असाध्य रोग दूर होतात, अशी मान्यता आहे. त्यामुळे येथे स्नान करण्यासाठी दुरवरुन लोक येतात.
- येथे लोक स्नान करतात व नंतर भास्कर देवाला जल अर्पण करतात.
ही आहे मंदिराची विशेषता
- हे मंदिर यूपी आणि एमपीच्या सीमेवरल पहूंच नदीच्या किना-यावर आहे.
- सूर्योदयाची पहिली किरण थेट मंदिरातील गर्भागृहातील मूर्तीवर पडते, अशी या मंदिराची विशेषता आहे.
- मंदिराचे पुजारी रामाधार पांडे यांनी सांगितले की, मंदिरात 400 वर्षांपासून रोज 8 किलो तूपाने अखंड ज्योत तेवत ठेवली आहे. येथे मंदिरात सूर्य यंत्र स्थापित आहे. असेच एक यंत्र पेरु (दक्षिण अमेरीका) येथे आहे.
तूप साठवण्यासाठी खोदल्या आहेत 9 विहिरी
- येथे मकर संक्रांती आणि अन्य फेस्टीव्हलदरम्यान एवढे तूप देवाला अर्पण केले जाते की, तूप ठेवण्यासाठी मंदिरातच 9 विहिरी खोदण्यात आल्या आहेत.
- पूर्वी मंदिरात सातच विहिरी होत्या. मात्र त्या पूर्ण भरल्यावर मंदिरातील प्राचीन विहिरीचे बांधकाम पक्के करुन त्यात तूप साठवण्यात आले. जेव्हा हीदेखील विहिर पूर्ण भरली तेव्हा 20 फूट खोल आणि 10 फिट रुंद अशी आणखी एक विहिर खोदली गेली. आता यामध्येही तूप साठवले जात आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.