येथे 24 तास / येथे 24 तास जळत राहतात मृतदेह, कधी थंड पडत नाही चीतांची आग

Dec 16,2017 12:03:00 AM IST

काशीमध्ये महास्मशान मणिकर्णिका घाटावर शेकडो वर्षांपासून चिता जळत असून या आजपर्यंत विझल्या नाहीत. मान्यतेनुसार अघोर स्वरुपात शिव येथे विराजमान आहेत. काशीमध्ये मृत्यू झाल्यास आणि येथे अंत्यसंस्कार केल्यास मृत व्यक्तीला महादेव तारक मंत्र देतात. येथे मोक्ष प्राप्त करणारा कधीही पुन्हा गर्भात पोहोचत नाही.


त्रिशुळावर उभी आहे काशी
काशी विश्वनाथ मंदिराचे प्रमुख आचार्य पं श्रीकांत मिश्र सांगतात की, पुराण आणि धर्मशास्त्रामध्ये काशी भगवान शंकराच्या त्रिशुळावर उभी असल्याचे वर्णीत आहे. मणिकर्णिका घाटाची स्थापना अनादी काळात झाली आहे. सृष्टीच्या रचनेनंतर भगवान शिवने स्वतःच्या निवासासाठी हे नगर वसवले आणि भगवान विष्णू यांना धर्म कार्यासाठी पाठवले होते.


कसे पडले कुंडाचे नाव
भगवान विष्णू यांनी हजारो वर्षांपर्यंत मणिकर्णिका घाटावर तप केले होते. महादेव प्रकट झाल्यानंतर भगवान विष्णूंनी आपल्या चक्राने पुष्कर्णी तलाव (कुंड) चे निर्माण केले होते. तत्पूर्वी त्यांनी कुंडात स्नान केले होते. या दरम्यान त्यांच्या कानातील मुक्तायुक्त कुंडल पाण्यात पडले. त्यानंतर या कुंडाचे नाव मणिकर्णिका कुंड असे पडले. या कुंडाचा इतिहास पृथ्वीवर गंगा अवतरण पूर्वीचा मानला जातो.


शिव देतात तारक मंत्र
पं शैलेश त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महास्मशान मणिकर्णिका घाट महादेवाचे आवडते ठिकाण होते. मान्यतेनुसार बाबा विश्वनाथ आणि देवी पार्वती अन्नपूर्णा रुपात भक्तांचे कल्याण करतात. भगवान शिव अघोर स्वरुपात मृत व्यक्तीच्या कानात तारक मंत्र सांगून त्याला मुक्तीचा मार्ग देतात. याच कारणामुळे मणिकर्णिका घाटावर चीतांचा अग्नी नेहमी जळत राहतो.


काय सांगतात घाटावरील स्थानिक लोक
घाटावर राहणारे एक वृद्ध नरेश बिसवानी सांगतात की, महादेव चितेच्या भस्माने शृंगार करतात. यामुळे येथील चितेचा अग्नी थंड पडत नाही. दररोज कमीतकमी 30 ते 35 चिता जळतात. अंत्यसंस्कारासाठी केवळ वाराणसीतूनच नाही तर देशाच्या कानाकोपर्यातून लोक येतात. हे ठिकाण मुक्तिधाम नावानेसुद्धा प्रसिद्ध आहे.


पुढील स्लाईड्सवर पाहा येथील काही खास फोटो आणि वाचा रोचक माहिती...

येथे चोवीस तास अंत्यसंस्कार होत राहतात. चिता जळत असतात.येथे विविध अघोरी साधू तप करताना दिसतात.मणिकर्णिका घाटावर अग्नी थंड करण्यासाठी 94 अंक लिहितात.नवरात्रीमध्ये सप्तमीच्या दिवशी शेकडो वर्षांपासून महास्मशान मणिकर्णिका घाटावर रात्रभर स्मशान नाथ बाबासमोर नगरवधू नृत्य करतात.भगवान विष्णूंनी हजारो वर्ष मणिकर्णिका घाटावर तप केले होते.राजा हरिश्चंद्रच्या काळापासून येथे अग्नी विकत घेण्याची प्रथा चालत आली आहे.सतुआ बाबांचा आश्रम घाटापासून जवळच आहे. या पवित्र ठिकाणी महादेवानी वृद्धाचे रूप घेऊन बाबांना दर्शन दिले होते.मान्यतेनुसार जगत गुरु आदि शंकराचार्य काशीला आले होते तेव्हा याच ठिकाणी त्यांना चांडाळ वेशधारी महादेवाने दर्शन दिले होते.शंकराचार्यांनी तपश्चर्येच्या माध्यमातून ओळखले होते की, चांडाळच्या कपाळावर जे तेज दिसत होते ते ब्रह्मांडात कुठेही नाही.पंचवृक्ष आंबा, लिंब, पिंपळ, वड आणि पालाशच्या लाकडांनी चिता जळतात. त्यावर चंदनाचे लाकूडही ठेवले जाते.जगातील हे एकमेव असे ठिकाणी आहे जेथे मनुष्याचा मृत्यूसुद्धा मंगल मानला जातो. शव यात्रेमध्ये मंगल वाद्य वाजवले जातात. शव यात्री स्मशानात नाचतातसुद्धा.मणिकर्णिका महास्मशानात सृष्टीचे तिन्ही गुण सत्व, रज आणि तम समाविष्ट आहेत.महादेव प्रकट झाल्यानंतर भगवान विष्णूंनी आपल्या चक्राने पुष्कर्णी कुंडचे निर्माण केले होते.महास्मशान मणिकर्णिका घाट महादेवाचे आवडते ठिकाण आहे.
X