MYTH: येथे रात्री / MYTH: येथे रात्री थांबायला घाबरतात लोक, कोणी थांबले तर घडते ही घटना

Jan 08,2018 11:39:00 AM IST

राजस्थानातील एक मंदिर प्राचीन काळापासूनच खूप गूढ रहस्य राहिले आहे. बाडमेर जिल्ह्यात स्थित असलेल्या या मंदिराचे नाव किराडू मंदिर असे आहे. संपूर्ण राजस्थानमध्ये खजुराहो मंदिर नावाने प्रसिद्ध असलेले हे मंदिर प्रेमी युगुलांना विशेष आकर्षित करते. परंतु येथील एक भयावह सत्य जाणून घेतल्यानंतर संध्याकाळनंतर या मंदिरात कोणताही व्यक्ती थांबण्याचे धाडस करत नाही. असे मानले जाते की, या मंदिरात सूर्यास्तानंतर थांबलेला व्यक्ती दगड बनतो. किराडूमध्ये मुख्यतः पाच मंदिर असून हे 900 वर्ष जुने आहेत.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, या मंदिरात रात्री थांबणारे लोक का बनतात दगड....

कोणी आणि का दिला होता शाप या मान्यतेमागे एक रोचक कथा आहे. असे सांगितले जाते की, कधीकाळी किराडूच्या जवळपास लोकांची वस्ती होती. ही जागा एका शापामुळे उजाड झाली. हजारो वर्षांपूर्वी येथे एक तपस्वी आले होते. त्यांचासोबत त्यांचे शिष्य होते. तपस्वी एके दिवशी शिष्यांना गावात सोडून देश भ्रमणासाठी निघून गेले. या दरम्यान शिष्यांची तब्येत बिघडली. गावकर्यांनी शिष्यांची कोणत्याच प्रकारे मदत केली नाही. तपस्वी परत किराडूमध्ये आल्यानंतर त्यांनी शिष्यांची दुर्दशा पाहून गावकर्यांना शाप दिला की, ज्या लोकांचे हृदय दगडाचे आहे त्यांना मनुष्य रुपात राहण्याचा हक्क नाही. यामुळे तुम्ही सर्व दगड व्हाल. गावामध्ये केवळ एका महिलेने शिष्यांची मदत केली होती. तपस्वीने तिच्यावर दया करून तिला गावातून निघून जाण्यास सांगितले. गावातून जाताना मागे वळून पाहू नको असेही सांगितले. ती महिला गावातून निघून गेली परंतु तिच्या मनात शंका होती की, तपस्वीचा शाप खरा आहे की नाही. तिने मागे वळून पाहिले आणि तीसुद्धा दगड झाली. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, या मंदिराविषयीच्या इतर काही रोचक गोष्टी..दगड बनलेल्या महिलेची मूर्ती आजही उपस्थित किराडू मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या सिहणी गावामध्ये दगड बनलेल्या महिलेची मूर्ती पहावयास मिळते. त्या महिलेची दगडाची मूर्ती या घटनेचा पुरावा मानली जाते. यामुळे या मंदिर परिसरात रात्रीच्या वेळी कोणीही जात नाही. पुढे जाणून घ्या, किराडू मंदिरांचे निर्माण कोणी केले...किराडू मंदिरांचे निर्माण - किराडू मंदिरांचे निर्माण कोणी केले याविषयी कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. परंतु या ठिकाणी 12 व्या शतकातील तीन शिलालेख उपलब्ध असून यावरही या मंदिरांच्या उभारणीविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. पहिला शिलालेख विक्रम संवत 1209 माघ चुतुर्दशी तिथीनुसार 24 जानेवारी 1153 चा असून हा गुजरातच्या चौलुक्य कुमार पाल यांच्या काळातील आहे. दुसरा शिलालेख विक्रम संवत 1235 चा असून तोसुद्धा चौलुक्य राजा भीमदेव द्वितीयचे सामंत चौहान मदन ब्रह्मदेव यांचा आहे. इतिहासकारांच्या माहितीनुसार किराडू मंदिरांचे निर्माण 11 व्या शतकात झाले असून यांचे निर्माण परमार वंशाचे राजा दुलशालराज आणि त्यांच्या वंशजांनी केले होते.किराडूमध्ये प्राचीन काळी पाच भव्य मंदिरे होते. परंतु 19 व्या शतकाच्या सुरुवातीला आलेल्या भूकंपामध्ये या मंदिरांचे खूप नुकसान झाले. आज या पाच मंदिरांमधील केवळ विष्णू आणि सोमेश्वर मंदिर थोड्याफार प्रमाणात ठीक स्थितीमध्ये आहेत. सोमेश्वर मंदिर येथील सर्वात मोठे मंदिर आहे. स्थानिक मान्यतेनुसार विष्णू मंदिरापासून येथे स्थापत्य कलेची सुरुवात झाली आणि सोमेश्वर मंदिराला या कलेच्या उत्कर्षाचा अंत मानले जाते.
X