आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या ठिकाणी झाला होता भगवान परशुराम यांचा जन्म, वाचा इतरही रोचक गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर शहरापासून 28 किलोमीटर अंतरावर भगवान परशुराम यांचे जन्मस्थळ आहे. साडेसात नद्या आणि पर्वतरांगेत वसलेल्या जानापाव ठिकाणाशी भगवान परशुराम यांच्या आयुष्यातील विविध घटना निगडित आहेत. परशुराम जयंतीच्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला जानापाव आणि भगवान परशुराम यांच्यासाठी संबंधित काही खास गोष्टी सांगत आहोत.


- महर्षीं जमदग्नी यांची तपोभूमी तसेच भगवान परशुराम यांचे जन्मस्थळ जानापाव, इंदूरच्या महू तहसील क्षेत्रामध्ये हसलपूर गावात स्थित आहे.
- मान्यतेनुसार जानापाव येथे जन्म घेतल्यानंतर भगवान परशुराम विद्या ग्रहण करण्यासाठी कैलास पर्वतावर गेले होते.


कुंडातून निघतात या नद्या...
- जानापाव पर्वतरांगेतून साडेसात नद्यांचा उगम होतो. यामधील काही नद्या यमुना तर काही नर्मदा नदीला मिळतात.
- येथून चंबळ, गंभीर, अंग्रेड आणि सुमारीया नावाचा नद्या तसेच साडेतीन नद्या बिरम, चोरले, कारम आणि निकेडेश्वरी यांचा उगम होतो.
- या नद्या जवळपास 740 किलोमीटर वाहून शेवटी यमुना तसेच साडेतीन नद्या नर्मदा नदीमध्ये जाऊन मिसळतात.


भगवान परशुराम यांच्या जन्माशी संबंधित कथा...
- भगवान परशुराम यांचे वडील भृगुवंशी ऋषी जमदग्नी आणि आई राजा प्रसेनजीत यांची मुलगी रेणुका या होत्या.
- जमदग्नी ऋषी अत्यंत तपस्वी आणि ओजस्वी होते. ऋषी जमदग्नी आणि रेणुका यांना रुक्मवान, सुखेण, वसु, विश्ववानस आणि परशुराम हे पाच पुत्र झाले.
- एकदा परशुरामाची माता रेणुका स्नान करुन आश्रमातून येत होती. 
- तेव्हा संयोगाने राजा चित्ररथसुद्धा तेथेच जलविहार करत होते.
- राजाला पाहून रेणुकाच्या मनात विकार उत्पन्न झाला. त्याच अवस्थेत त्या आश्रमात पोहोचल्या. 
- जमदग्नी ऋषींनी योगबलाने रेणुकाला पाहून त्यांच्या मनातील गोष्ट जाणुन घेतली आणि आपल्या मुलांना मातेचा वध करण्यास सांगितले. 
- परंतु मोहवश कोणीच त्यांच्या आज्ञेचे पालन केले नाही. तेव्हा परशुरामाने विचार न करता आईचे शिर कापले. 
- हे पाहून जमदग्नी ऋषी प्रसन्न झाले त्यांनी इतर चार मुलांना चेतना शून्य होण्याचा शाप दिला आणि परशुरामाला वरदान मागण्यास सांगितले.


तेव्हा परशुराम यांनी तीन वरदान मागितले...
- पहिले, परशुरामाने आपल्या आईला जिवंत करण्याचे आणि ही गोष्ट तिला माहिती होऊ न देण्याचे वरदान मागितले.
- दुसरे, आपल्या चारही चेतना शून्य भावंडांची चेतना पुन्हा देण्याचे वरदान मागितले.
- तिसरे वरदान स्वतःसाठी मागितले, त्यानुसार त्यांचा कोणत्याही शत्रू आणि युद्धामध्ये पराजय होणार नाही तसेच दीघायुष्य प्राप्त व्हावे.
- पिता जमदग्नी ऋषी मुलाचे हे वरदान ऐकून प्रसन्न झाले आणि त्यांची इच्छा पूर्ण होण्याचा आशीर्वाद दिला.


पुढील स्लाईड्सवर पाहा, जानापावचे काही खास फोटो...

बातम्या आणखी आहेत...