Home | Jeevan Mantra | Teerath Darshan | Some Best Summer Destintion Of India

भारतातील 20 कूल डेस्टिनेशन, उन्हाळ्याच्या सुटीत करु शकणार नाहीत मिस...

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Mar 13, 2018, 12:00 AM IST

तीव्र उन्हाळा सुरु झाला आहे. मैदानी परिसरात गरम हवा लोकांना त्रस्त करत आहे. सुट्यांमध्ये थंड ठिकाणी जाण्याची इच्छा होते.

 • Some Best Summer Destintion Of India
  तीव्र उन्हाळा सुरु झाला आहे. मैदानी परिसरात गरम हवा लोकांना त्रस्त करत आहे. सुट्यांमध्ये थंड ठिकाणी जाण्याची इच्छा होते. यावेळी हिमायलचे हिल स्टेशन मनाली, डलहौजी, नैनीताल यांसरख्या डेस्टीनेशनर खुप गर्दी असते. अशाच लोकांना शांत ठिकाण हवे असते. आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांविषयी सांगणार आहोत जेथे मनाली, शिमला यांसारखी गर्दी असणार नाही. जाणुन घ्या सातपुडाच्या रानी पंचमढीच्या खास गोष्टी...
  1. पंचमढी
  सातपुडा पर्वतावर वसलेले पंचमढी मप्र आणि आजुबाजूच्या राज्यातील लोकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. मप्रमध्ये सर्वात अगोदर सुर्य किरणे ही पंचमडीच्या धूपगढ किल्ल्याच्या टोकावर पडतात. याव्यतिरिक्त बी-फॉल, पांडव गुहा, पहाडावर वसलेले चौरागढ शिव मंदिरसोबतच अनेक दर्शनीय स्थळे आहेत. येथे उन्हाळ्यात मप्रच्या इतर भागांच्या तुलनेत गार हवा असते.

  पुढील स्लाईडवर पाहा देशातील इतर कूल डेस्टिनेशनविषयी सविस्तर माहिती...

 • Some Best Summer Destintion Of India

  2. तामिया-पातालकोट
  पंचमढीपासून तीन तासांच्या अंतरावर मप्रच्या सातपुडा पर्वतावर तामिया आहे. तामियापासून काही अंतरावर पातालकोट आहे. पातालकोट हे जमीनीपासून 1700 फूट खाली वसले आहे. येथे तीन-चार व्यू पॉइंट आणि महादेवाचे मंदिर आहे. हे ठिकाण खुप रहस्यमय आहे. तामियाच्या आजुबाजूला अनेक डोंगरांवर गेस्टहाउस आणि हॉटेल बनल्या आहेत. हे ठिकाण सकाळ-संध्याकाळ गार असते.

 • Some Best Summer Destintion Of India

   3. कुन्नूर
  तामिळनाडूमध्ये कुन्नूर निलगिरी पर्वतावर वसले आहे. येथे मिळणा-या कुरिनजी फूलांमुळे याचे नाव कुन्नूर पडले आहे. हैरीटेज ट्रेन, टायगर हिल सीमेट्री, डूग फोर्टवर पर्यटक रिलॅक्स होऊ शकतात.
   

 • Some Best Summer Destintion Of India

  4. अंदमान अँड निकोबार
  समुद्राने घेरलेले अंदमान आणि निकोबार पर्टकांसाठी शानदार डेस्टिनेशन आहे. येथे अंदमान आयलँड, नील आयलँड, ग्रेट निकोबार आयलँडसोबतच अनेक आकर्षक ठिकाणे आहेत.
   

 • Some Best Summer Destintion Of India

  5. माथेरान
  महाराष्ट्रामध्ये मुंबईपासून 110 किमी अंतरावर हे लहानसे हिल स्टेशन आहे. गाड्या-मोटारला प्रतिबंध असलेले माथेरान हे आशियातील एकमेव हिलस्टेशन आहे. ज्यामुळे येथील हवा शुध्द आहे. येथे अलेस्जेंडर पॉइंट, वन ट्री हिल, इको पॉइंट यांसारखे अनेक दर्शनीय स्थळे आहेत.

 • Some Best Summer Destintion Of India

  6. पाचगनी
  पाचगनी हे महाराष्टातील प्रसिध्द हिल स्टेशन आहे. हे पाच पर्वतांनी घेरलेले आहे. येथून कृष्णा नदी वाहते. कमळगढ, प्रतापगढ किल्ला, टेबल लँड, सिडनी पॉइंटसोबतच ब्रिटिश आणि पारसी स्टाइलमध्ये बनलेले खुप सुंदर आहेत.
   

 • Some Best Summer Destintion Of India

  7. गंगटोक
  सिक्कीमची राजधानी गंगाटोकचा हा नाइट व्यू पर्यटकामध्ये खास लोकप्रिय आहे. येथे चोलामू पासून हनुमान टोक, कंचनजंघा नॅशनल पार्क हे टूरिस्ट स्पॉट आहेत.

 • Some Best Summer Destintion Of India

  8. पन्हाळा
  महाराष्ट्रमधील कोल्हापुरात पन्हाळा हिल स्टेशन खुपच मस्त आहे. येथे पन्हाळा हा किल्ला आहे. योबतच पाराशर गुफा, महालक्ष्मी मंदिर, सनसेट आणि नसराइज पॉइंट दर्शनीय आहे. 
   

 • Some Best Summer Destintion Of India

  9. तवांग
  सुदूर अरुणाचल प्रदेशाच्या तवांगमध्ये भारतातील सर्वात मोठा बौध्द मठ आहे. येथे अनेक धबधबे, गरम पाण्याचे झरे, सेला पास, जसवंद गढ, माधुरी लेक, बुमला पास यांसारखे स्पॉट आहेत. जे उन्हाळ्यात आनंद देतात.

   

 • Some Best Summer Destintion Of India

  10. सापुतारा
  गुजरामधील सापुतारा हे हिलस्टेशनसुध्दा लोकप्रिय आहे. सापुतारा लेक, हटगढ किल्ला, सापुतारा म्युझियम येथील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे.
   

 • Some Best Summer Destintion Of India

  11. मुन्नार
  संरक्षित जंगलांमुळे केरळमधील मुन्नार हिल स्टेशन ओळखले जाते. येथील वातावरण थंड असते. ईको पॉइंट, टी म्यूजियम, कुंडाला लेकसोबतच येथे पर्यटकांना आकर्षित करणारे अनेक स्पॉट आहेत.
   

 • Some Best Summer Destintion Of India

  12. कुर्ग
  कर्नाटकातील कुर्गला स्कॉटलँड ऑफ इंडियासुध्दा म्हटले जाते. हे क्षेत्र विविध प्रकारची कॉफी आणि चहाच्या प्लांटेशनसाठी प्रसिध्द आहे. इरुपू फॉल, गोल्डन टेंपल आणि येथील हिरवळ तुमचा तनाव दूर करु शकते.
   

 • Some Best Summer Destintion Of India

  13. माउंट आबू
  माउंट टाबू हे राजस्थानमधील एकमेव हिलस्टेशन आहे. याला राजस्थानचे समर कॅपिटलसुध्दा म्हटले जाते. राज्यापालासाठी येथे एक कायदेशीर घर आहे. माउंट आबूचे नक्की लेक, अचलगढ, पीस पार्कसोबतच सुंदर डोंगर तुमचे मन मोहून टाकेल.

 • Some Best Summer Destintion Of India

  14. कोडईकनाल
  तामिळनाडूतील कोडईकनाल मसाले, होम मेड चॉकलेट, हर्बल टी आणि कॉफीसाठी प्रसिध्द आहे. कोडईकनालला प्रिंसेस ऑफ हिल्ससुध्दा म्हटले जाते. ग्रीन व्हॅली व्ह्यू, कोडई लेक, कोकर्स वॉक येथील प्रसिध्द टूरिस्ट स्पॉट आहे.

 • Some Best Summer Destintion Of India

  15. शिलाँग
  मेघालयची राजधानी शिलाँगला स्कॉटलँड ऑफ ईस्टसुध्दा म्हटले जाते. शिलाँग पीक, एलीफंट फॉल्स, लेडी हैदरीसोबतच अनेक टूरिस्ट स्पॉट येथील आकर्षणाचे केंद्र आहे.

 • Some Best Summer Destintion Of India

  16. इडुक्की
  केरळमधील इडुक्की स्टेशन खुप शांत आणि सौम्य आहे. येथे प्रसिध्द पेरियार टायगर रिजर्व्ह आहे, सोबत जंगले आहेत.
   

 • Some Best Summer Destintion Of India

  17. महाबळेश्वर
  महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिध्द हिल स्टेशन आहे. येथे मोठ्या प्रमाणात तळे आहेत. वेन्ना लेक, महाबळेश्वर मंदिर, एलीफंट हेड पॉइंटसोबतच अनेक ठिकाणे उपलब्ध आहेत.
   
   

 • Some Best Summer Destintion Of India

  18. नंदी हिल
  कर्नाटकात सर्वात अगोदर सुर्य करणे हे नंदी हिलवर पोहोचतात. सनराइज पाहण्यासाठी येथे दूरुन दूरुन पर्यटक येतात. येथे टिपू सुलतानचा किल्ला, नंदी मंदिर, म्यूझियमसोबतच अनेक स्पॉट आहेत.

 • Some Best Summer Destintion Of India

  19. हॉर्सले हिल्स
  हॉर्सले हिल्स हे आंध्र प्रदेशातील सर्वात प्रसिध्द हिल स्टेशन आहे. बंगलुर आणि चेन्नईतून येथे अनेक लोक पर्यटनासाठी येतात. वाइल्ड लाइफ सेंचुरी, वॉटरफॉल आणि शूदिंग व्ह्यू पर्यटकांना पसंत आहे.

   

 • Some Best Summer Destintion Of India

  20. कोलिंपोंग
  पश्चिम बंगालमधील हे हिल स्टेशन ब्रिटिश कॉलोनियल आर्किटेक्चर पाहण्याचे ठिकाण आहे. येथील बाजार सोडले तर हे खुप शांत ठिकाण आहे. नेवरा नॅशनल पार्क, मंगल धाम, देवलो हिल, लोगांव सारखे काही ठिकाण पर्यटकांना खुप आवडतात.

Trending