आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील एकमेव मंदिर, जेथे होते महादेवाच्या पायाच्या अंगठ्याची पूजा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माउंट आबूमधील अचलेश्वर महादेव जगातील असे एकमेव मंदिर आहे, जेथे महादेवाच्या पायाच्या अंगठ्याची पूजा केली जाते. या ठिकाणी महादेवाची विविध प्राचीन मंदिरे असल्यामुळे माउंट आबुला अर्धकाशी नावाने ओळखले जाते. या मंदिराशी संबंधित मान्यतेनुसार, महादेवाच्या याच अंगठ्यावर माउंट आबू पर्वत स्थित आहे. ज्या दिवशी महादेवाच्या पायाच्या अंगठ्याचे हे चिन्ह नष्ट होईल त्याच दिवशी हा पर्वतही नष्ट होणार असल्याचे मानले जाते.


मंदिरात आहे चार टन वजनाचा नंदी -
या मंदिराच्या मुख्य दरवाजामधूनच पंचधातूने बनलेली नंदीची एक विशाल मूर्ती दिसते. या मूर्तीचे वजन साडेचार टन आहे. मंदिराच्या आत गाभार्‍यात शिवलिंग पाताळखंड स्वरुपात दिसते आणि ठीक यावर पायाच्या अंगठ्याचे चिन्ह आहे. या चिन्हाची शिवलिंग रुपात पूजा केली जाते.


कोठे आहे हे मंदिर -
स्कंद पुराणानुसार वाराणसी शिव नगर असून माउंट आबू याचे उपनगर आहे. अचलेश्वर महादेव मंदिर राजस्थानातील एकमेव हिल स्टेशन माउंट आबूपासून जवळपास 11 किलोमीटर दूर अचलगढ पर्वतावर स्थित आहे.


पुढील स्लाईड्सवर पाहा फोटो...

बातम्या आणखी आहेत...