Home | Jeevan Mantra | Teerath Darshan | These Are 8 Ancient Caves Of India

हजारो वर्ष जुन्या आहेत भारताच्या या 8 गुहा, यांचे रहस्य अजूनही कायम

यूटिलिटी डेस्क | Update - Mar 15, 2018, 03:32 PM IST

जगभरात अनेक प्राचीन गुहा आहेत. या गुहा प्राचीन असण्यासोबतच धार्मिक दृष्टीनेही यांचे खूप महत्त्व आहे.

 • These Are 8 Ancient Caves Of India

  जगभरात अनेक प्राचीन गुहा आहेत. या गुहा प्राचीन असण्यासोबतच धार्मिक दृष्टीनेही यांचे खूप महत्त्व आहे. आज आम्ही तुम्हाला भारतातील अशाच 8 प्राचीन आणि खास गुहांची माहिती देत आहोत.


  वराह गुहा(महाबलीपुरम, तामिळनाडू)
  तामिळनाडूच्या महाबलीपुरम येथील वराह गुहा खुप प्रसिध्द आहे. येथे विष्णु देवाचे मंदिर आहे. या गुहांची कलाकृती इतकी सुंदर आहे की, युनेस्कोने याला जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. या गुहेव्यतिरिक्त सित्तनवसल आणि नॉर्थमलाई गुहा सुध्दा प्रसिध्द आहे. महाबलीपुरम येथे जाण्यासाठी बस, ट्रेन, विमान सहज उपलब्ध आहे.

 • These Are 8 Ancient Caves Of India

  एलिफंटा गुहा (महाराष्ट्र)
  मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियापासून जवळपास 12 किलोमीटर अंतरावर एलिफंटा नावाची गुहा आहे. ही गुहा येथील पर्वत कोरून तयार करण्यात आली आहे. येथे एकूण 7 गुहा असून यामधील महेश मूर्ती गुहा सर्वात महत्त्वाची आहे. एलिफंटाला घारापुरी नावानेही ओळखले जाते. या गुहेमध्ये अर्धनारीश्वर, भगवान शिव यांच्या मूर्ती आहेत. 

 • These Are 8 Ancient Caves Of India

  अजिंठा-वेरूळ गुहा(महाराष्ट्र)
  जगभरात प्रसिध्द असलेल्या अजिंठा-वेरूळ गुहा पर्यंटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. येथील सुंदर चित्रकला आणि मूर्त्या कलाप्रेमिंसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही. येथील वाघोरा नदी या गुहांचे सौंदर्य वाढवते. म्हटले जाते की, या गुहांचा शोध 1819 मध्ये आर्मी ऑफिसर जॉन स्मिथ आणि त्यांच्या दलाने लावला होता. ते शिकार करण्यासाठी येथे आले होते. तेव्हा त्यांना या 29 गुहा दिसल्या. यानंतर या गुहा संपुर्ण जगात प्रसिध्द झाल्या.

 • These Are 8 Ancient Caves Of India

  अमरनाथ गुहा (जम्मू-कश्मीर) -
  अमरनाथची गुहा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचे आणि खास तीर्थस्थळ आहे. या ठिकाणाची महादेवांनी देवी पार्वतीला अमरकथा सांगितली होती. हजारो वर्ष या गुहेमध्ये आजही नैसर्गिक शिवलिंग तयार होते.

 • These Are 8 Ancient Caves Of India

  बादामी गुहा(कर्नाटक)
  कर्नाटकातील बादामीमध्ये सुंदर आणि नक्षीदार गुहा आहेत. बादामीच्या चार गुहांमधील दोन गुहा या विष्णु देव, एक महादेव आणि एक जैन धर्मासंबंधीत सांगितल्या आहेत. लाल दगडाने तयार केलेल्या या गुहा सुंदरतेसाठी प्रसिध्द आहे. कर्नाटकातील एहिलो गुहा सुध्दा आकर्षणाचे केंद्र आहे. बदामीला जाण्यासाठी विमान, बस आणि रेल्वे मार्ग उपलब्ध आहेत.

 • These Are 8 Ancient Caves Of India

  परशुराम महादेव गुहा मंदिर (राजस्थान) -
  राजस्थानच्या अरावलीमध्ये स्थित या प्राचीन गुहा मंदिराला परशुराम महादेव गुहा मंदिर म्हटले जाते. मान्यतेनुसार या गुहेचे निर्माण भगवान विष्णूचे अवतार परशुराम यांनी आपल्या परशु अस्त्राने पर्वत कापून केले होते. या गुहेमध्ये एक स्वयंभू शिवलिंग आहे. येथेच भगवान परशुराम यांनी महादेवाची तपश्चर्या केली होती.

 • These Are 8 Ancient Caves Of India

  सीताबेंग-जोगीमारा गुफा (छत्तीसगढ)
  छत्तीसगढमधील सरगुजा जिल्ह्यातील रामगड पर्वतांमध्ये सीताबेंग आणि जोगीमारा नावाचा दोन गुहा आहेत. येथे जाण्यासाठी तुम्हाला बोगद्यातून जावे लागते. छत्तीसगढच्या घनदाट जंगलातून या गुहेपर्यंत जाण्याचा मार्ग आहे. या गुहा कांगडा व्हॅली येथील नॅशनल पार्कजवळ स्थित आहेत.

 • These Are 8 Ancient Caves Of India

  बाराबर गुहा (बिहार)
  बाराबर गुहा बिहारच्या गया जिल्ह्यात आहे. या गुफा दोन पर्वतामध्ये आहेत. येथे एकूण चार गुहा आहेत आणि एक नागार्जुनच्या पर्वतामध्ये आहे. या गुहा देशातील प्राचिन गुहांमधील एक आहेत. येथे कलाकृती पाहावयास मिळतात.

Trending