आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरक चतुर्दशी : येथे आहे यमदेवाचे जगातील एकमेव मंदिर, या आहेत खास गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवाळीच्या एक दिवस अगोदर नरक चतुर्दशी असते. या सणाचे दक्षिण भारतात खूप महत्त्व आहे. या दिवशी यमदेवाचे स्मरण करून घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर दक्षिण दिशेला तांदुळाची रास मांडून त्यावर दिवा लावून ठेवला जातो. यमदेवाकडे अकाल मृत्यू दूर ठेवण्यासाठी प्रार्थना केल्यास घरामध्ये कोणाचाही अकाली मृत्यू होत नाही. या दिवसाला यमाचा दिवस मानले जाते. यामुळे नरक चतुर्दशीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला यमदेवाच्या एका अनोख्या मंदिराची माहिती सांगत आहोत....

हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यातील भरमौर नावाच्या गावात हे मदिर आहे. हे मंदिर एखाद्या घराप्रमाणे दिसते. या मंदिराजवळ पोहचल्यानंतरही अनेक लोकांना मंदिरात जाण्याचे धाडस होत नाही. मंदिराच्या बाहेरूनच नमस्कार करून निघून जातात. कारण या मंदिरात धर्मराज यमदेव राहतात.

पुढे वाचा या मंदिरासंदर्भातील इतर काही खास गोष्टी....
बातम्या आणखी आहेत...